विद्यार्थ्यांसाठी चला साकारू गणराय स्पर्धा

विद्यार्थ्यांसाठी चला साकारू गणराय स्पर्धा
Published on

२४ (पान २ साठी, अॅंकर)

विद्यार्थ्यांसाठी ‘चला साकारू गणराय’ स्पर्धा

राजापूर हायस्कूलचा पुढाकार ; मित्रमेळा संस्थेचा उद्या उपक्रम

राजापूर, ता. १८ ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजापूर येथील मित्रमेळा या संस्थेने चला साकारू गणराय ही स्पर्धा राजापूर हायस्कूल मर्यादित आयोजित केली आहे .
कोकणात मूर्तिकलेचा सुदृढ वारसा अनेक वर्ष जपला जातो. राजापूर हायस्कूलमधील बालमूर्तिकारांना त्यांच्या मनातील बाप्पांचे रूप प्रत्यक्ष साकारता यावे यासाठी मित्रमेळा राजापूर व राजापूर हायस्कूलने संयुक्तपणे ही स्पर्धा हायस्कूल मर्यादित आयोजित केली आहे. ही स्पर्धा रविवारी (ता. २०) कलामंदिर राजापूर येथे होणार आहे. यामध्ये ५वी ते ७वी, ८वी ते १०वी व ११वी ते १२वी असे तीन गट आहेत. प्रत्येक गटात दोन विजेते व एक उत्तेजनार्थ अशी तीन बक्षिसे असणार आहेत. या स्पर्धेत प्रत्येक गटात सुमारे २० तरी मुले सहभाग घेतील, असे नियोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक मुलाला शाडू माती व एक पुठ्ठ्याचा तुकडा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मूर्ती बनवण्यासाठीचे साहित्य स्वत: आणायचे आहे.

या उपक्रमासाठी मित्रमेळाचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक भालशंकर, कलाशिक्षक घोसाळे, उमाशंकर दाते, सुजित पारकर मेहनत घेत आहेत. ही स्पर्धा तीन गटात होणार असून, स्पर्धेची वेळ १० ते १२ अशी असेल. परीक्षण करतेवेळी मुलांना अल्पोपाहार दिला जाणार आहे तसेच विजेत्यांची नावे त्याचवेळी घोषित केली जातील. बक्षिस वितरणासाठी वास्तूविशारद जगदीश पवार, संस्था पदाधिकारी, शिक्षक उपस्थित राहणार आहेत. परीक्षक म्हणून नीलेश रहाटे, नीलेश खानविलकर व काशिनाथ गुरव हे कलाक्षेत्रातील तज्ञमंडळी आहेत. ज्यांना या स्पर्धेदरम्यान मुलांचे हस्तकौशल्य पाहावयाचे असेल त्यांनी सकाळी दहा ते बारा या वेळेत भेट द्यावी, असे आवाहन मित्रमेळातर्फे करण्यात आले आहे.

विजेत्यांना बक्षीसे...
या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांक ४०० रुपये, द्वितीय क्रमांक २५० रुपये व उत्तेजनार्थ १५० रुपये अशी रोख पारितोषिके व प्रमाण पत्र देण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com