जिल्हास्तरीय पोस्टर स्पर्धेत सायली कदम प्रथम
२७ (पान २ साठी)
- rat१८p१०.jpg-
२३M२४१२३
सायलीने काढलेले चित्र
पोस्टर स्पर्धेत सायली कदम प्रथम
संगमेश्वर, ता. १८ ः दरवर्षी २६ जून हा दिवस जगभर जागतिक अंमली पदार्थविरोधी दिन म्हणून विविध विधायक उपक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो. यावर्षी सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट सावर्डे व सावर्डे पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पोस्टर डिझाईन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यासाठी विद्यार्थ्यांना अमली पदार्थविरोधी दिन हा विषय देण्यात आला होता. यामध्ये सायली कदमने प्रथम क्रमांक मिळवला. ईशा राजेशिर्के (द्वितीय), तुळशी भुवड (तृतीय) यांनी यश मिळवले आहे. यामधून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक कलाकारांनी या चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यातून सायली कदम हिच्या चित्राची निवड झाली. १५ ऑगस्टला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तिला गौरवण्यात आले. या वेळी सावर्डे पोलिस ठाण्याचे जयंत गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद आंबेरकर, पोलिस अंमलदार मोहिते, कोकणचे ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश राजेशिर्के, प्रा. माणिक यादव आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

