ःदापोलीतील उपविभागीय अभियंत्यांच्या बंगल्याला गळीत
२८ (पान २ साठी)
- rat१८p३७.jpg ः
P२३M२४१७७
दापोली ः ऐन पावसाळ्यात उपविभागीय अभियंता यांचे निवासस्थान असलेल्या इमारतीच्या छप्पराची सुरू असलेली दुरुस्ती.
-----------
दापोलीत अभियंत्यांच्या बंगल्याला गळती
पावसात दुरुस्तीचे काम ; १० लाखाची निविदा
दाभोळ, ता. १८ ः दापोली येथील शासकीय विश्रामगृह आवाराजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी निवासस्थानामधील उपविभागीय अभियंता यांच्या बंगल्यात पावसाळ्यात गळती लागली. ती गळती काढण्याऐवजी भर पावसाळ्यात या इमारतीची सगळी कौले व रिफा काढून त्या बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या शासकीय इमारतीचे नुकसान होईल, याचे भानही अभियंत्याना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग दापोलीचे उपविभागीय अभियंता पटेल यांची चिपळूण येथे बदली झाल्यावर त्यांच्या पदावर कदम हे रूजू झाले आहेत. त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय निवासस्थानात गळती लागल्याने, गळती काढण्याऐवजी पावसात संपूर्ण छप्पर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी १० लाख रुपयांची निविदाही काढण्यात आली असून वर्कऑर्डरही झाली आहे. या कामाला सुरवात केली असून, इमारतीवरील रिफा बदलण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्या खाली पत्रा मारण्यात आला आहे. आता त्यावर कौले बसवण्यात येणार आहेत. या संदर्भात उपविभागीय अभियंता कदम यांना विचारले असता त्यांनी मला तेथे राहावयास यायचे असल्यामुळे संपूर्ण छप्पर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

