रत्नागिरी ः शौचालय, स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त

रत्नागिरी ः शौचालय, स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त
Published on

फोटो ओळी
-rat१८p४०.jpg-, KOP२३M२४१८६
rat१८p४१.jpg-,KOP२३M२४१८७ rat१८p४२.jpg-KOP२३M२४१८५ रत्नागिरी- तहसील कार्यालयातील शौचालय आणि स्वच्छतागृहाच्या दयनीय अवस्थेमुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीने नागरिक हैराण आहेत.


शौचालय, स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील चित्र; दिव्याखाली अंधार
रत्नागिरी, ता. १८ ः जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील तहसीलदार कार्यालयाच्या शौचालय आणि स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीने नागरिक हैराण आहेत. तालुक्यातून विविध ठिकाणाहून कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना कार्यालयाकडे येताना नाक मुठीतच धरून यावे लागते. एवढेच नव्हे तर वरच्या मजल्यावर असलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कर्मचारी या दुर्गंधीमुळे बेजार झाले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात नव्याने बांधण्यात आलेल्या दोन इमारतींपैकी ही एक इमारत आहे. या इमारतीमध्ये तहसीलदार कार्यालय, आधारकार्ड नोंदणी कक्ष, कामगार कल्याण, पर्यटन विकास महामंडळ, वजनमाप विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तालुका आणि जिल्ह्यातून नागरिक येथे येतात; परंतु इमारतीच्या पोर्चमधून आत पाऊल टाकले की, दुर्गंधीनेच स्वागत होते. त्यामुळे येणारा प्रत्येकजण नाक मुठीत धरूनच या इमारतीमध्ये प्रवेश करतो. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रमुख इमारतीमध्ये ही अवस्था असल्याने अनेकांची नाराजी व्यक्त केली.
स्वच्छतेचा नारा देणाऱ्या महसूल विभागाच्या दिव्याखाली अंधार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. एवढ्या सुसज्ज इमारतीमधील शौचालये आणि स्वच्छतागृहांची एवढी दुरवस्था पाहून येणारे नागरिक नाक मुरडून जात आहेत. अनेक दिवसांपासूनचे हे चित्र आहे; परंतु याच्याकडे कोणी गांभीर्याने घेतलेले नाही. तहसील कार्यालयाच्या शौचालय आणि स्वच्छतागृहाकडे पाहून किळस येईल, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे महसूल विभागाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ती स्वच्छ करून घ्यावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनीदेखील दुर्गंधीने त्रस्त आहेत. त्यांनीही शौचालय आणि स्वच्छतागृहाची स्वच्छता करावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com