नेरुमधील अवैध धंद्यांविरोधात महिला शिष्टमंडळाची स्थापना

नेरुमधील अवैध धंद्यांविरोधात
महिला शिष्टमंडळाची स्थापना
Published on

नेरुमधील अवैध धंद्यांविरोधात
महिला शिष्टमंडळाची स्थापना

पोलिसांना निवेदन; लक्ष देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः नेरूर गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी महिला शिष्टमंडळ स्थापन करण्यात आले. तसा लेखी ठराव येथील पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला यांना देण्यात आला.
नेरुर ग्रामपंचायत हॉल येथे महिला सभा झाली. यावेळी गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या सभेत महिलांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली असून या सभेमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील तसेच गावातील इतर पदसिद्ध महिला उपस्थित होत्या. गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी यावेळी शिष्टमंडळ स्थापन करण्यात आले. दरम्यान, नेरूर गावच्या या विषयावर जातीने लक्ष घालू असे, आश्वासन मुल्ला यांनी उपस्थित महिलावर्गाला दिले. यावेळी सरपंच सौ. भक्ती घाडीगावकर, संजना परब, आरती नेरूरकर, स्वरा नेरूरकर, जान्हवी परब, सुवर्णा चव्हाण, आकांक्षा चव्हाण, उषा नेरूरकर, सोनाली चव्हाण, मानसी नेरूरकर, धनश्री सारंग, नेहा गावडे, दिपश्री नेरुरकर, श्रीमती मनिषा गावडे, प्रेशिला फर्नांडीस, पुष्पलता म्हाडदळकर आदी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com