

फोटो ओळी
-RATCHL183.JPG ःKOP23M24226 चिपळूण ः प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
-----------
अलोरे ग्रामपंचायतीत अळिंबी लागवड प्रशिक्षण
चिपळूण, १८ः स्वयंरोजगार निर्मितीचे उद्दिष्ट्य समोर ठेवून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अलोरे, ग्रामपंचायत व लगतच्या ग्रामपंचायती, बचतगट, सामाजिक संस्था यांच्या सहयोगाने अलोरे येथे अळिंबी लागवड प्रशिक्षण झाले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अखिल भारतीय समन्वित अळिंबी संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय पुणे येथील अधिकाऱ्यांनी धिंगरी अळिंबी लागवडीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले.
अलोरे परिसरातील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. कृषी विद्यापिठाचे डॉ. अशोक जाधव, कनिष्ठ कवक शास्त्रज्ञ एन. जी. देसाई आदींनी अळिंबी लागवड कशी करावी या प्रक्रियेबाबतची संपूर्ण माहिती व प्रात्यक्षिक केले. कृषी विभागाचे मनोज गांधी यांनी अळिंबी लागवडीचे आवाहन केले. गिमवी गावचे अळिंबी व्यावसायिक ऋषिकेश नलावडे यांनी व्यवसायाबरोबरच मार्केटिंग कसे करावे, याचे धडे दिले. याचवेळी अळिंबी बेड, अळिंबीपासून तयार केलेली उत्पादने तसेच माहिती सांगणारे तक्ते यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. 50 शेतकऱ्यांना अळिंबी प्रशिक्षण व प्रमाणपत्र व व्यवसाय करण्याकरिता 3 हजार रुपयांचे साहित्य प्रत्येकी देण्यात आले. तंटामुक्त अध्यक्ष वसंत चिपळूणकर यांचा प्रशिक्षणार्थी यांच्यावतीने सत्कार केला. अलोरेच्या सरपंच अंजली मोहिते, उपसरपंच प्रमोद महाजन, नीलेश चावरे, सुमेधा जाधव, तुषार चव्हाण, दत्ताराम मोहिते, रामदास चिपळूणकर, प्रकाश आंब्रे, ग्रामविकास अधिकारी अमर आयवळे, नागावे सरपंच प्रकाश चिपळूणकर, प्रकाश पालांडे, कुंभार्लीचे सरपंच रवींद्र सकपाळ, धामणवणेचे सुनील सावंत, तिवरे उपसरपंच पूजा कदम, पेढांबे उपसरपंच राजेंद्र कदम, सदस्य विजया पेंढाबकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.