रत्नागिरी-जिल्ह्यात विद्युत अपघातात 11 जणांचा बळी

रत्नागिरी-जिल्ह्यात विद्युत अपघातात 11 जणांचा बळी

Published on

जिल्ह्यात विद्युत अपघातात ११ जणांचा बळी
रत्नागिरी, ता. १८ ः जिल्ह्यात गेल्या वर्षभरात झालेल्या विद्युत अपघातामध्ये ११ जणांचा बळी गेला तर ११ जण गंभीर झाले आहेत.
अशा अपघातात २६ प्राण्यांचा जीव गेला असून, ३५ प्राणी जखमी झाले आहेत.
विद्युत अपघातासंदर्भात तांत्रिक अहवाल देण्यासाठी शासनाच्या कार्यरत असलेल्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून ही माहिती मिळाली. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग विद्युत निरीक्षक कार्यालयामार्फत महावितरणच्या अपघातांबाबत पाहणी केली जाते. एखादी दुर्घटना घडली की, महावितरणकडून या कार्यालयाला तत्काळ माहिती दिली जाते. त्यानंतर या कार्यालयाचे अधिकारी घटनास्थळी जाऊन अपघात नेमका कशामुळे झाला, याचा सविस्तर तांत्रिक अहवाल विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून दिला जातो. त्या अहवालावरच पुढील कार्यवाही होते. या कार्यालयाने विद्युत अपघातांची वर्षभराच्या आकडेवारी जाहीर केली. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत वीज वितरण व्यवस्थेमध्ये विद्युतवाहिन्या तुटणे, शॉक लागणे, उपकेंद्र, विद्युतखांब आणि ट्रान्सफॉर्मर आदी ठिकाणी अपघात होऊन सहाजणांनी आपला जीव गमावल्याची नोंद झाली आहे तर सहाजण गंभीर जखमी आहेत. या अपघातांमध्ये १० जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. याच काळात वीजवितरण व्यवस्थेदरम्यान झालेल्या अपघातामुळे २६ जनावरांनी जीव गमावला असून, ३१ जनावरे गंभीर बाधित झाली आहेत. खासगी कंपन्यांमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, २ जण जखमी झाले आहेत. प्रायव्हेट पर्सन होम (ए. जी. कनेक्शन) दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून, ३ जण जखमी झाले आहेत.
अचानक सुटलेल्या विद्युतप्रवाहामुळे झालेल्या अपघातात एकाचा बळी गेला असून, २० प्राणी दगावले आहेत तर २४ प्राण्यांना गंभीर दुखापत झाली आहे. विद्युतवाहिनीला स्पर्श झाल्यामुळे ३ बळी गेले असून, ३ जखमी झाले आहेत. सुरक्षा उपायांचे उल्लंघन झाल्याने ३ जणांचा बळी गेला असून, १ जण गंभीर जखमी झाला आहे तर १ जण किरकोळ जखमी झाला आहे, अशी माहिती उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग विद्युत निरीक्षक ए. एस. पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com