देवगड इंद्रप्रस्थ हॉलमध्ये
पेडणेकर ज्वेलर्सचे प्रदर्शन

देवगड इंद्रप्रस्थ हॉलमध्ये पेडणेकर ज्वेलर्सचे प्रदर्शन

Published on

24246
देवगड ः जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या दालनाचा प्रारंभ करताना अनुश्री पारकर, सोनाली घाग आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

देवगड इंद्रप्रस्थ हॉलमध्ये
पेडणेकर ज्वेलर्सचे प्रदर्शन

कुडाळ, ता. १८ ः जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे विविध दागिन्यांची विक्री व प्रदर्शनाचे आयोजन देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉलच्या भव्य दालनात केले आहे. पहिल्या दिवसापासून या प्रदर्शनाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. सोमवारपर्यंत (ता.२१) हे प्रदर्शन व विक्री या ठिकाणी असणार आहे.
समृद्धी पेट्रोल पंपच्या मालक रसिका भुजबळ व रोटरी क्लब ऑफ देवगडच्या माजी अध्यक्ष अनुश्री पारकर यांच्या हस्ते या प्रदर्शन व विक्रीचा प्रारंभ झाला. यावेळी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या व्यवस्थापक सोनाली घाग, स्टाफ मंगेश देवरुखरकर, सागर सुतार, आबा पाटकर, मीरा गावडे, साक्षी मर्ये, यशश्री काणेकर, तृप्ती कळोजे, सौरभ मोहिते, निरज थापा आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी पेडणेकर ज्वेलर्स यांचे सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये वेगळी खासियत आहे. दागिन्यांची विविध डिझाईन ग्राहकांना आकर्षित करणारी आहे. कोकणातील सुवर्णप्रेमींनी देवगड येथील या दालनाला निश्चितच भेट द्या, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले. व्यवस्थापक घाग म्हणाल्या, ‘‘१८ वर्षांपासून आम्ही कोकणात प्रदर्शन व विक्रीच्या माध्यमातून येत आहोत. या ठिकाणी ग्राहकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पेडणेकर ज्वेलर्सच्या शाखा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी व कणकवली येथे असून सणासुदीच्या काळात हे प्रदर्शन आयोजित केले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com