रत्नागिरी- मेहंदी स्पर्धेत सिद्धी शिंदे प्रथम
फोटो ओळी
rat18p45.jpg-KOP23M24233 रत्नागिरी ः मराठा मंडळ आयोजित व सकाळ समूह माध्यम प्रायोजित मेहंदी स्पर्धा व पाककला स्पर्धेतील विजेत्यांसह मान्यवर पाहुणे आणि परीक्षक पहिल्या छायाचित्रात, दुसऱ्या छायाचित्रात मेहंदी काढताना स्पर्धक.
मराठा मंडळ आयोजित
मेहंदी स्पर्धेत सिद्धी शिंदे प्रथम
रत्नागिरी, ता. १८ : मराठा मंडळ आयोजित मेहंदी स्पर्धेत प्रथम क्रमांक सिद्धी शिंदे हिने पटकावला. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मनपा देसाई, तृतीय सबरिन काझी, उत्तेजनार्थ मयुरी धारपवार आणि अनुष्का महाजन यांनी मिळवला. या स्पर्धेसाठी सकाळ माध्यम समूहाने माध्यम प्रायोजकत्व दिले होते.
माळनाका येथील मराठा मंडळ हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठा मंडळाचे कार्यवाह उपेंद्र सुर्वे, चंद्रमोहन देसाई, विलास सावंत, सौ. वंदना देसाई आणि श्रीमती सुजाता साळवी, समन्वयक स्मिता कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. मेहंदी स्पर्धेचे परीक्षण सौ. माधुरी वाघोले यांनी केले. या स्पर्धेत १९ स्पर्धकांनी भाग घेतला होता.
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित पाककला स्पर्धेचे परीक्षण आहारतज्ज्ञ सौ. कोमल तावडे आणि सौ. मेघना शेलार यांनी केले. या स्पर्धेत 25 स्पर्धकांनी भाग घेतला. तृणधान्यापासून गोड किंवा तिखट पदार्थ बनवण्याची स्पर्धा होती. यामध्ये प्रथम क्रमांक सौ. मनिषा महाजन, द्वितीय सौ. सुप्रिया सावंत, तृतीय सुजाता साळवी आणि उत्तेजनार्थ बक्षीस सौ. श्रुती बने यांना मिळाले. अशा स्पर्धांतून मेहंदी व पाककृती बनवणाऱ्या महिलांना व्यासपीठ मिळाल्याचे विजेत्यांनी सांगितले. या सर्व विजेत्यांना विजयदशमीच्या दिवशी होणाऱ्या भव्य कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या दिवशी सोने लुटण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानंतर बक्षीस वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

