रत्नागिरी ः भाडेकरूंची माहिती 7 दिवसात देणे बंधनकारक
भाडेकरूंची माहिती न दिल्यास कारवाई
अप्पर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश; गुन्हेगारी रोखण्यासाठी निर्णय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः घरमालकांनी त्यांच्या घरात भाडेकरू ठेवताना भाडेकरूंचे संपूर्ण नाव, सध्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन फोटो व त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता, घरभाडे करारनामा, ओळखपत्र आदी कागदपत्रे स्थानिक पोलिस ठाण्याकडे देणे बंधनकारक आहे. भाडेकरूंची ही माहिती स्थानिक पोलिस ठाण्याला न दिल्यास कारवाई केली जाईल, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी काढले आहेत.
जिल्ह्याला २३७ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने आंबा व मासेमारी व्यवसाय केला जातो. रत्नागिरी, चिपळूण व खेड येथे औद्योगिक वसाहती आहेत. आंबा व मासेमारी व्यवसाय करणारे तसेच बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक हे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इतर जिल्ह्यातून, इतर राज्यातून, नेपाळ येथून कामगार येतात तसेच औद्योगिक वसाहती असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिक नोकरी व्यवसाय व इतर कामानिमित्त येऊन भाड्याने घरे, दुकान गाळे, फ्लॅट, फार्महाऊस घेऊन राहतात. परंतु, याबाबतची माहिती स्थानिक पोलिस ठाण्याला देण्यात येत नाही. दहशतवादी कारवाया व गुन्हेगारी पार्श्वभूमीवर एखादा गुन्हा घडल्यावर त्याची तत्काळ उकल होण्यासाठी घरमालकांनी घर भाड्याने देताना भाडेकरूंची संपूर्ण माहिती पोलिसांना देणे आवश्यक ठरते जेणेकरून दहशतवादी व गुन्हेगारी कारवाया आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल.
पोलिसांना सात दिवसांत माहिती द्यावी
नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीत राहणारे मालमत्ताधारक यांनी घरे, दुकान गाळे भाडेतत्त्वावर देणे किंवा पोटभाडेकरू ठेवणे, विक्री केल्यास विकत घेणाऱ्यांची, भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यास सात दिवसांच्या आत कळवणे आवश्यक आहे. यासाठी अप्पर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये प्रतिबंध आदेश पारीत केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

