

swt1824.jpg
24254
विजयदुर्गः येथील किल्यावर हेलियम डे साजरा करण्यात आला. यावेळी आमदार प्रमोद जठार यांच्यासह अन्य उपस्थित होते.
swt1825.jpg
24247
विजयदुर्गः येथे हेलियम डे च्या निमित्ताने किल्यावर रॅली काढण्यात आली होती. (छायाचित्रे ः संतोष कुळकर्णी)
विजयदुर्गला खगोल केंद्रासाठी प्रयत्न
प्रमोद जठारः ‘ जागतिक हेलियम डे’निमित्त किल्यावर रॅली
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १८ः हेलियमचे पाळणाघर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या तालुक्यातील किल्ले विजयदुर्गवर आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ‘जागतिक हेलियम डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. हेलियम हा ब्रह्मांडाची नांदी असून त्याचा अभ्यास वाढावा, यासाठी विजयदुर्गला ‘खगोल केंद्र’ बनवण्यासाठी प्रयत्न आहेत. विविध बाबींचा समावेश असलेला सुमारे पाच कोटी रूपये खर्चाचा संभाव्य आराखडा असल्याचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी सांगितले.
सुर्यग्रहणावेळी नॉर्मन लॅकियर या शास्त्रज्ञाने १८ ऑगस्ट १८६८ ला किल्ले विजयदुर्गवर ज्या ठिकाणी दुर्बिण लावून हेलियम वायुचा शोध लावला होता त्या ‘साहेबांचे ओटे’ या ठिकाणी मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. आज हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळकरी मुलांसोबत अवकाशात फुगे सोडून आनंद व्यक्त करण्यात आला. या निमित्त्याने किल्ल्यावर फेरी काढण्यात आली. ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सिंधुरत्न समृध्दी योजना समिती, विजयदुर्ग ग्रामपंचायत यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी माजी आमदार जठार, विजयदुर्गचे प्रभारी सरपंच रियाझ काझी, रघुनाथ (अजाकाका) धुळप, आरिफ बगदादी, रवींद्र तिर्लोटकर, प्रदीप साखरकर, शुभा कदम, नीरजा जठार, मानसी वाळवे, माजी सरपंच प्रसाद देवधर आदी उपस्थित होते. श्री. जठार म्हणाले, किल्ले विजयदुर्गवरून शास्त्रज्ञांनी हेलियम वायुचा शोध लावल्यामुळे या ठिकाणाला फार मोठे महत्व आहे. हेलियम हा ब्रह्मांडाची नांदी आहे. किल्ला पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने काही अडचणी आहेत. यासाठी शासनाच्या पर्यायी जागेत कायमस्वरूपी खगोल केंद्र, आरमार संग्रहालय, पर्यटकांसाठी लेझर शो, बगीचा बनवण्याचा मानस असुन सुमारे पाच कोटी रूपये खर्चाचा संभाव्य आराखडा असल्याचे सांगितले. प्रभारी सरपंच काझी यांनी, पुढीलवर्षी हा कार्यक्रम आणखी दिमाखात करण्यावर भर राहील, असे सांगितले. यावेळी संदीप बांदिवडेकर, रोहित महाडिक, रवी शेटये, बबलू सावंत, महेश खोत, नरेंद्र भाबल आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.