संगमेश्वरमधील बॅटरीचे दुकान चोरट्यांनी फोडले
२२ (पान ३ साठी)
संगमेश्वरमधील बॅटरीचे दुकान फोडले
संगमेश्वर, ता. १८ ः संगमेश्वर शास्त्रीपूल येथील डीके बॅटरी सर्व्हिस दुकान मागच्या बाजूने चोरट्याने फोडून त्यातील २२ बॅटऱ्या चोरून नेल्या.. या बॅटऱ्यांची किंमत सुमारे ६० हजार रुपये असून याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यात सुरेंद्र सुरेश डिके (रा. तुरळ डिकेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. संगमेश्वर कसबा शास्त्रीपूल येथे डीके बॅटरी सर्व्हिस नावाचे चारचाकी व दुचाकी वाहनांचे बॅटरी खरेदी-विक्रीचे दुकान आहे. ८ ते ९ ऑगस्टदरम्यान चोरट्याने दुकानाच्या मागील बाजूस भिंतीतील सिमेंट लोखंडी खिडकी उचकटवून काढून दुकानात प्रवेश केला. चोरट्याने सुमारे ६० हजार किमतीच्या बॅटऱ्या चोरून नेल्य, अशी फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस तपास करत होते. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करत प्रसाद विलास साळवी (वय २५, रा. परटवणे) या संशयिताला अटक केली. त्याच्याकडून काही बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असून या प्रकरणी आणखी काही आरोपी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस फौजदार प्रशांत शिंदे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

