-साडेतीन लाखांची फसवणूक
महिलांची साडेतील लाखांची फसवणूक
हातशिलाई मशिन, घरकुलचे अमिष ; खेडमध्ये प्रकार; तपास सुरू
खेड, ता. १८ ः शासनातर्फे सवलतीच्या दरात महागडी हातशिलाई मशिन व घरकुले देण्याचे आमिष दाखवत ‘त्या’ दोन भामट्यांनी तालुक्यातील आणखी ३० महिलांची ३ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याबाबत येथील पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली. यामुळे आतापर्यंत तब्बल ९६८ महिलांची २६ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे पुढे येत आहे. फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.
महाराष्ट्र क्रांतिसेनेचा अध्यक्ष संदीप शंकर डोंगरे (वाराणी, कासार, जि. बीड) याला येथील पोलिसांनी शिताफीने अटक केली. चार दिवसाच्या पोलिस कोठडीनंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्याचा सहकारी बबन मारूती मोहिते यालाही काही दिवसांत ताब्यात घेण्यासाठी पथक पाठवणार असल्याचे पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी सांगितले.
या दोघा भामट्यांनी तालुक्यातील महिला बचतगटातील महिलांना शासनातर्फे सवलतीच्या दरात महागडी हातशिलाई मशिन व घरकुले देण्याच्या नावाखाली आतापर्यंत ९३८ महिलांकडून तब्बल २३ लाख रुपये उकळल्याचे तपासात उघड झाले होते. याशिवाय अहमदनगर, परभणी, अकोला, बीड जिल्ह्यातील महिला बचतगटातील महिलांनाही लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे तपासात समोर आले होते. फसवणूक झालेल्या महिलांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक नितीन भोयर सातत्याने करत आहेत. त्यानुसार फसवणूक झालेल्या महिलांनी पोलिस ठाणे गाठत रितसर तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार आणखी ३० महिलांची ३ लाख ४४ रुपयांची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. महिलांना विविध शासकीय योजनांसाठी सवलतीच्या आमिषाखाली ३० महिलांकडून प्रत्येकी १० हजार रुपये तर ११ महिलांकडून घरकूल व गोठ्यासाठी प्रत्येकी ४ हजार रुपये उकळत ४४ हजार रुपयांना गंडा घातल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलिस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन भोयर करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

