प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस
४८ (पान ३ साठी)
संगमेश्वरात मनसे कार्यकर्त्यांना नोटीस
साडवली, ता. १८ ः मुंबई-गोवा महामार्गावरील टोलनाके, ठेकेदारांची कार्यालये फोडण्याच्या घटना लक्षात घेऊन मध्य रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांना त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांसह संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश गावित यांनी त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले आहे. त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत व रखडलेल्या कामाविरोधात मनसे आक्रमक झाल्याचे दिसत आहे. जिल्हा पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. शुक्रवारी दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण व त्यांचे सहकारी मनविसे उपतालुकाध्यक्ष परेश धामणाक, दीपक फडकले, बाळ येलोंडे यांना चव्हाण यांच्या कडवई येथील निवासस्थानातून संगमेश्वरचे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश गावित यांनी ताब्यात घेतले. संध्याकाळी प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस देऊन सर्वांना सोडून देण्यात आले. देवरूखमध्येही तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर, मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे शेखर नलावडे, अक्षय झेपले या कार्यकर्त्यांवरही अशीच कारवाई करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

