बस चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिर

बस चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिर

Published on

२४२२७


बस चालकांसाठी नेत्रचिकित्सा शिबिर

आरटीओतर्फे आयोजन; उपजिल्हाधिकाऱ्यांकडून लाभ घेण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १८ ः उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत २१ ते २५ ऑगस्ट या कालावधीत मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे. बसेसच्या अपघातांमध्ये होणारी मोठ्या प्रमाणातील जिवितहानी टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या बसचालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी आज येथे केले.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा पोलिस उपअधीक्षक के. एल. सावंत, राज्य परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक अभिजित पाटील, कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अधिकारी व्ही. व्ही. जोशी, सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभाग उप कार्यकारी अभियंता सीमा गोवेकर, राष्ट्रीय महामार्ग उप विभाग सावंतवाडी आर. पी. कांबळे, राष्ट्रीय महामार्ग उप विभाग खारेपाटण ए. एस. शिमीवाळ, सावंतवाडी मुख्याधिकारी सागर साळुंखे, महामार्ग पोलिस विभागाचे व्ही. बी. केसरकर, सहायक पोलिस निरीक्षक भारत फारने, जिल्हा रुग्णालयतील डॉ. अमित आवळे आदी उपस्थित होते.
श्री. सुकटे म्हणाले, ‘‘उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत २१ ते २५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित केलेल्या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयातील वाहनचालक व कामानिमित्त येणाऱ्या वाहनचालकांनी तपासणी करून घ्यावी. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड, सावंतवाडी यांच्या सेवाभावी संस्थेचे सहकार्यातून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे हे शिबिर राबविले जाणार आहे. ग्लोबल फाऊंडेशन, कुडाळमार्फत राज्य परिवहन विभाग देवगड, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या एसटी डेपोतील वाहनचालक व गोवा, पुणे, मुंबई या मार्गावर चालणाऱ्या खाजगी प्रवासी बसेसच्या चालकांसाठी झाराप येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. याचा लाभ वाहनचालकांनी घ्यावा.’’ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे म्हणाले, "जिल्हा नियोजन निधीतून एकूण आकारमानाच्या किमान १ टक्का निधी हा रस्ता सुरक्षा उपाययोजनेसाठी देण्यात यावा. हा निधी राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागांमार्फत रस्ता सुरक्षा उपाययोजनेसाठी दिलेल्या सूचना यासाठी खर्च केला जाणार आहे. आयोजित शिबिरात वाहनचालकांनी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी करुन घ्यावी. जिल्ह्यातील सर्व शाळांमधील खासगी वाहनचालकास सहभागी होण्यासाठी शाळांना कळविण्यात येणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com