पुंडलिक दळवींचा वाढदिवस
सावंतवाडीत विविध उपक्रमांनी

पुंडलिक दळवींचा वाढदिवस सावंतवाडीत विविध उपक्रमांनी

Published on

24275
सावंतवाडी ः येथे सफाई कामगारांना धान्य वाटप करताना पुंडलिक दळवी.

पुंडलिक दळवींचा वाढदिवस
सावंतवाडीत विविध उपक्रमांनी
सावंतवाडी, ता. १८ ः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यावर वाढदिनी विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यांच्या निवासस्थांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते पदाधिकारी कार्यकर्त्याच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने येथील पालिकेच्या सफाई कामगारांना धान्य वाटप तर शिरोडा नाका येथील दिव्यांग केंद्रात त्यांनी मुलांना खाऊ पाटप केले.
शहराचे ‘रियल हिरो’ असलेल्या नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना एक थोडासा हातभार द्यावा, या उद्धेशाने त्यांना लागणारे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कन्या श्रीया दळवी हिच्या हस्ते केले. दोन महिन्याचे वेतन नसल्याने पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी अलिकडेच एक दिवसाचे काम बंद आंदोलन केले होते; मात्र, शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने नागरिकांना वेठीस न धरण्याच्या विनंतीला मान देऊन ते पुन्हा सेवेत रुजू झाले. सफाई कर्मचारी आर्थिक विवंचनेत असून त्यांना चरितार्थ चालवणेही कठीण झाले आहे. त्यामुळे वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. दळवी यांनी सफाई कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. दुसरीकडे शहरातील शिरोडा नाका येथील दिव्यांग केंद्रात तेथील मुलांसोबत वाढदिवस साजरा करत तेथील मुलांना खाऊचे वाटप केले. यावेळी राष्ट्रवादीचे सावंतवाडी शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर, तालुका सरचिटणीस राकेश नेवगी, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जहूर खान, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन पाटकर, उद्योग व्यापार सेलचे तालुका उपाध्यक्ष याकूब शेख आदी उपस्थित होते. त्यांच्या निवासस्थानी वाढदिवस साजरा झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सामंत, भास्कर परब, अॅड. नकुल पार्सेकर, बाळ कनयाळकर, शिवाजी कुबल, रहीज शेख, समीर वंजारी, देवा टेमकर, हिदायत्तुला खान आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com