तिकिटाचे पैसे जास्त घेतल्याच्या
रागातून वाहकाच्या श्रीमुखात

तिकिटाचे पैसे जास्त घेतल्याच्या रागातून वाहकाच्या श्रीमुखात

Published on

तिकिटाचे जास्त पैसे घेतल्याच्या
रागातून वाहकाच्या श्रीमुखात

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १८ ः एसटीच्या तिकिटाचे पैसे जास्त घेतल्याच्या रागातून युवतीने वाहकाच्या श्रीमुखात भडकवल्याची घटना आज सायंकाळी बांद्यात घडली. वाहकाने बांदा पोलिसांत युवतीविरोधात अदखलपत्र गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की बांदा येथून दोडामार्ग येथे सायंकाळी जाणाऱ्या एसटीत युवती बसली होती. वाहकाने २० रुपये तिकीट दर सांगितला; मात्र युवतीने नकार देत १० रुपये देणार असल्याचे सांगितले. यावरून वाद होत युवतीने वाहकाच्या श्रीमुखात भडकवली. वाहकाने एसटी बांदा कट्टा कॉर्नर येथे थांबवत बांदा पोलिसात तक्रार दाखल केली. बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून दोडामार्ग येथे रवाना करण्यात आले. यामुळे प्रवाशी व स्थानिकांचे मात्र मनोरंजन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com