-जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांची धरपकड

-जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांची धरपकड

Published on

(पान ३ साठी)

जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांची धरपकड

१०१ जणांवर गुन्हे ; रत्नागिरीतील ११ जणांचा समावेश


रत्नागिरी, ता. ११ ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पनवेल येथील सभेनंतर जिल्ह्यात मनसे आक्रमक झाली. गुरुवारी राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोल नाका, हातखंबा येथील कार्यालय, तर शुक्रवारी महामार्गावरील जेसीबी, त्यानंतर तालुक्यातील पाली खानू मधील महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीचे कार्यालय मनसेने फोडले. या प्रकरणी शहरातील ११ तर जिल्ह्यात १०१ मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

तालुक्यातील पाली खानू मधील कंपनीचे कार्यालय मनसेने फोडले. मनसेच्या पनवेलमधील निर्धार मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्याच्या मुद्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर सणकून टीका केली. राज ठाकरेंच्या त्या भाषणानंतर येथील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली असून यात ९७ जणांवर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. चिपळूणमधील २२ जणांचा समावेश असून रत्नागिरी शहरातील ११ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण १०१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मनसेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांच्यासह ११ जणांना पोलिसांनी केली अटक केली आहे, तर ९७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
-----
ताब्यात घेतलेले मनसे कार्यकर्ते

दापोली- ३, खेड- २०, गुहागर- ५, चिपळूण- २२, राजापूर- १४, मंडणगड- २, लांजा- २, देवरूख- ४, शहर- ११, संगमेश्वर- ४, अलोरे- १, सावर्डे- ५, जयगड-३, नाटे-२, पूर्णगड- ५, असे एकूण १०१ मनसे सैनिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com