

सावंतवाडी बसस्थानकातून
महिलेचे दीड लाख चोरले
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः पारपोली येथील सौ. शुभांगी परब (वय ७०) यांच्या पर्समधील दीड लाख रुपये येथील एसटी स्थानकात केसरी गाडीत चढताना चोरट्याने लांबविले. या प्रकाराबाबत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया येथील पोलिस स्थानकात उशिरापर्यंत सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी, की पारपोली येथील शुभांगी परब व तिचे पती परशुराम परब हे आज सावंतवाडी पोस्ट कार्यालयात आले होते. त्यांनी पोस्ट खात्यामधील आपली दीड लाखांची रक्कम काढली. ती रक्कम शुभांगी परब यांनी आपल्या पर्समध्ये ठेवली. त्यानंतर त्यांनी बसस्थानक गाठले. या पर्समध्ये बँकेचे पासबुक, आधारकार्ड आदी महत्त्वाची कागदपत्रे होती. सावंतवाडी-केसरी या बसमध्ये त्या चढल्या आणि सीटवर पर्स ठेवली. काही वेळाने पाहिले असता त्यांच्या पर्सची चैन उघडी असल्याचे दिसले. त्यांनी खात्री केली असता पैसे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले; मात्र बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने त्यांनी पोलिस ठाणे गाठले. याबाबत सावंतवाडी पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी तक्रार दाखल करून घेण्याचे निर्देश ठाणे अंमलदारांना दिले. उशिरापर्यत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया येथील पोलिस ठाण्यात सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.