अज्ञात मोटारीच्या धडकेत
कोलगावात वृद्धा जखमी

अज्ञात मोटारीच्या धडकेत कोलगावात वृद्धा जखमी

Published on

अज्ञात मोटारीच्या धडकेत
कोलगावात वृद्धा जखमी
सावंतवाडी, ता. १८ ः येथील कोलगाव जुना आयटीआयलगत गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारचालकाने वृद्धेला मागाहून धडक देत पलायन केले. यात ती गंभीर जखमी झाली. सत्यभामा कळंगुटकर (वय ८०) असे तिचे नाव आहे. ती नातेवाईकांसोबत रुग्णालयात आली होती. तेथून परतत असताना हा अपघात झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे का? याचा शोध पोलिस घेत आहेत. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकीच्या सदस्या रूपाली मुद्राळे, सुनिता बोर्डेकर व रवी जाधव यांनी सहकार्य केले. त्या महिलेच्या कमरेला व हाताला गंभीर दुखापत झाली असून सद्यस्थितीत ती बेशुद्ध होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com