नारळाचा वाढदिवस

नारळाचा वाढदिवस

Published on

४ (पान ६ साठी)


-rat१९p१.jpg-
२३M२४३३९
रत्नागिरी ः हातिस येथे कल्पवृक्षाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर नव्याने ७६ नारळ रोपांची लागवड करण्यात आली. या रोपाचे औक्षण करताना महिला. सोबत मरिन दिलीप भाटकर, डॉ. दिलीप नागवेकर आणि ग्रामस्थ.
----------

हातिसमध्ये कल्पवृक्षाचा ७६ वा वाढदिवस

ग्रामस्थांकडून स्वातंत्र्यदिनी उपक्रम; पर्यावरणाविषयी केले प्रबोधन

रत्नागिरी, ता. १९ ः हातिसमध्ये भैरी-जुगाई मंदिर परिसरात १५ ऑगस्ट १९४७ ला नारळाचे झाड लावून भारताचा स्वातंत्र्यदिन ग्रामस्थांनी साजरा केला होता. त्याला स्वातंत्र्यदिनी ७६ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्त ग्रामस्थांनी कल्पवृक्षाचे पूजन करून व केक कापून वाढदिवस साजरा केला.
ज्येष्ठ नागरिक जयवंत नागवेकर जे ४७ मध्ये एक वर्षाचे व दुसरे विजय नागवेकर हे दोन वर्षाचे होते. हे दोघंही या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले तसेच या वेळी मरिनर दिलीप भाटकर, शिक्षकनेते विनायक हातखंबकर, भारत शिक्षण मंडळाचे सदस्य संतोष कुष्टे, हातिस ग्रामविकास मंडळ हातिस आणि मुंबईचे अध्यक्ष दिवाकर नागवेकर, शंतनू नागवेकर, ग्रामपंचायत सदस्य जगन कीर आणि राधिका नागवेकर, पटवर्धन हायस्कूलचे कलाशिक्षक रूपेश पंगेरकर आणि अजित मुळीक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला वेदिका पाटील, राधिका नागवेकर, रसिका नागवेकर, पूर्वा नागवेकर, शमिका नागवेकर, नीता नागवेकर, आरती नागवेकर, मुग्धा नागवेकर, वीणा नागवेकर आदींनी नारळाचे पूजन केले. ग्रामविकास मंडळाचे माजी अध्यक्ष विजय नागवेकर, संदेश नागवेकर, अॅड. तुषार नागवेकर, माजी सेक्रेटरी जयवंत नागवेकर उपस्थित होते.
----------
डॉ. नागवेकरांकडून ७६ रोपांचे वितरण
मागील ३ वर्षे कृषिविद्यावेत्ता आणि ग्रामस्थ डॉ. दिलीप नागवेकर ग्रामस्थांना नारळ रोपांचे वाटप करत आहेत. गतवर्षी ७५ नारळरोपे दिली. घराशेजारी जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी त्यांची लागवड केली होती. यावर्षी त्यांनी गावात ७६ रोपांचे वाटप केले. त्याची लागवड स्वातंत्र्यदिनी करण्यात आली तसेच विद्याधर नागवेकर यांच्या जागेत मान्यवरांच्या हस्ते लागवड केली. या वेळी राजेंद्र नागवेकर, संयुक्त नागवेकर, प्रेरणा नागवेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com