-सती विद्यालयातील विद्यार्थिनींनी पाठवल्या सैनिकांना राख्या

-सती विद्यालयातील विद्यार्थिनींनी पाठवल्या सैनिकांना राख्या

२८ (पान ५ साठी)


- ratchl२०३.jpg-

P२३M२४६९०
चिपळूण ः माजी सैनिकांच्या उपस्थितीत भारतीय जवानांना राखी व शुभेच्छा संदेश पत्र पाठवताना सती चिंचघरी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनी.
------------

सती विद्यालयातील विद्यार्थिनींनी पाठवल्या सैनिकांना राख्या

चिपळूण, ता. २१ ः सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सती चिंचघरी येथील प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशाच्या सिमेवर लढणाऱ्या जवानांसाठी एक हजार राख्या पाठवल्या आहेत. भारतीय जवान प्राण पणाला लावून देशाची सेवा करतो. सर्वच जवानांना रक्षाबंधनाला आपल्या बहिणीची राखी बांधण्यासाठी घरी जाता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची भावना वाढीस लागावी, या हेतूने विद्यालयाच्या शिक्षकांनी सर्व विद्यार्थिनींना एकत्र करून १००० आकर्षक राख्या तयार केल्या. सोबत एक संदेश पत्र असे स्वतंत्र पाकिटात भरून भारतीय सीमेवरील जवानांना पाठविण्यात आले.
माजी सैनिक सुभेदार प्रदीपराव चाळके, नाईक प्रवीण भुरण, शिपाई दीपक राजवीर यांच्या हस्ते भारतीय जवानांना राख्या पाठवण्यात आल्या. कार्यक्रमावेळी माजी सैनिक वर्दीमध्ये आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेविषयी अधिक प्रबळ इच्छा निर्माण झाली. यावेळी भारत माता की जय...वंदे मातरम् अशा घोषणांनी सभागृह दणाणून निघाले. कार्यक्रमासाठी पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अनिल शिंदे, सदस्या ऋचिता निर्मळ, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा स्वरा कदम, सदस्या स्नेहल मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपक्रमासाठीयोगदान
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, शिक्षिका मनीषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत,अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, रूपाली खरात, ज्योती चाळके, वर्षा सकपाळ, शीतल पाटील, माधुरी खताळ, स्वरा भुरण यांनी विशेष मेहनत घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com