संधिवात आणि होमिओपॅथिक उपाययोजना

संधिवात आणि होमिओपॅथिक उपाययोजना

११ (सदर)

(८ ऑगस्ट टुडे २)

आरोग्यविचार - होमिओपॅथीचा--------लोगो

- rat२१p६.jpg ः
२३M२४७६०
डॉ. विश्वजीत मानकर

----

सर्वसामान्यपणे संधिवात कधीही पूर्ण बरा न होणारा असा असाध्य आजार समजला जातो; परंतु होमिओपॅथिक शास्त्रामध्ये हा आजार दोन स्वरूपात विभागला जातो. सहज साध्य, कष्ट साध्य. प्रथम आपण सहज साध्य अर्थात सहजपणे बरे होणारे संधिवाताचे स्वरूप समजावून घेऊ. यामध्ये नुकताच झालेला (acute) संधिवात, तीव्र थंड ऋतूमानामध्ये उद्भवलेला संधिवात, खाण्या-पिण्यातील चुकांमधून उद्भवलेला संधिवात उदा. फ्रिजमधील दही, ताकाचे सातत्याने आणि अतिरिक्त सेवन इत्यादी. अशा स्वरूपाचा संधिवात सहजसाध्य स्वरूपात मोडतो. सर्वप्रथम रोगामागचे कारण बाजूला करणे आणि योग्य औषधयोजना करणे. त्याचा संयुक्त परिणाम काही दिवसात दिसतो आणि या आजाराचे समूळ उच्चाटन होते.

----

संधिवात आणि होमिओपॅथिक उपाययोजना

जुनाट संधिवात, जो कष्ट साध्य स्वरूपात गणला जातो. यामध्ये होमिओपॅथीकडे येणारा रुग्ण हा आजार सुरू होऊन अन्य उपाययोजनांमध्ये व्यर्थ वेळ वाया घालवून मूळ आजार आणि त्यावर अन्य उपचार करत असताना झालेले साईडइफेक्ट यातून जुनाट असा गंभीर स्वरूपाचा आजार घेऊन आलेला असतो. होमिओपॅथी शास्त्राच्या आधारे हा आजार बरा करत असताना आजाराचे मूळ स्वरूप आणि औषधांचे झालेले दुष्परिणाम या दोन्ही गोष्टींचा साकल्याने विचार करून उपाययोजना करावी लागते. होमिओपॅथीच्या तत्त्वज्ञानानुसार काम करत असताना कोणत्याही आजाराच्या नावानुसार औषधयोजना करणे हे अत्यंत चुकीचे आहे. अगदी डोक्याच्या केसापासून पायांच्या नखापर्यंत. महत्वाची गोष्ट रुग्णाचा स्वभाव आणि रोगकाळात त्याची बदललेली मनस्थिती याचा विचार केला जातो. त्यामधून निर्माण झालेल्या रोगाचे कारण, जे बहुतांशी मानसिक आघात किंवा रोगनिर्मितीमागील अन्य कारणे असू शकतात. उदा. वातावरण, रुग्णाच्या सवयी, आहार या आधारे रोगकारणाच्या मुळाजवळ जाणे आणि त्या आधारे संपूर्ण रोगस्थितीचा विचार करणे, ज्यायोगे एक आणि केवळ एकच औषध निवडून निसर्ग नियमांना अनुसरून रोगमुक्ती होते.
वरील परिच्छेदातील माहिती विस्तृतपणे देण्याचे कारण केवळ संधिवातच नव्हे तर प्रत्येक सहज साध्य आणि कष्ट साध्य रोगामध्ये होमिओपॅथी शास्त्र कशा तऱ्हेने काम करते, हे समाजास अवगत होईल. जुनाट स्वरूपाचा संधिवात हा संधिवात बऱ्याचदा केवळ (pain killer) वेदनाशामक औषधे, जी रोगाच्या मुळाजवळ जाऊन रोगाचे समूळ उच्चाटन करणे अशा स्वरूपाची नाहीत. त्यामुळे हा रोग जुनाट व गंभीर स्वरूप धारण करतो. त्याचबरोबर जीवाचा धोकाही उद्भवू शकतो. उदा. सामान्य असणारा संधिवात सततच्या वेदनाशामक औषधाने हृदयासारख्या अत्यंत महत्वाच्या इंद्रियामध्ये शिरकाव करतो. यालाच rheumatic heart असे म्हणतात. जुनाट स्वरूपाच्या संधिवातामध्ये सांध्यांमध्ये विकृती निर्माण होते. उदा. सांध्यांमध्ये येणारी सूज, सांध्यांमध्ये येणारा वाकडेपणा इत्यादी. होमिओपॅथिक औषध योजनेनुसार प्रत्येक आजार बरा करत असताना शास्त्रीय नियमावली आहे. उदा. म्हणून आपण rheumatic heart ची होमिओपॅथिक औषधीयोजनेने बरी होणारी प्रक्रिया समजावून घेऊ.
हृदय हे अत्यंत महत्वाचे आहे, ज्यामध्ये स्थापित झालेला संधिवात हा हृदयातून पुन्हा सांध्यांकडे जाऊन यथाकाल तो शरीरातून बाहेर जाऊन पूर्ण व आदर्शवत रोगमुक्ती प्रदान केली जाते. यासाठी जी होमिओपॅथिक नियमावली आहे ती थोर होमिओपॅथिक शास्त्रज्ञ डॉ. हेरिंग यांनी सांगितलेली आहे. अशाप्रकारे जुनाट व गंभीर स्वरूप धारण केलेल्या आजारांमध्ये होमिओपॅथी निर्णायक काम करत असते आणि माझ्या उपचारपद्धतीमध्ये होमिओपॅथिक नियमावलीबरोबर कोणतीही तडजोड न करता शास्त्रशुद्ध पद्धतीने मी ती अवलंबितो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com