-चतुरंग प्रतिष्ठानद्वारा चिपळूण-रत्नागिरीत

-चतुरंग प्रतिष्ठानद्वारा चिपळूण-रत्नागिरीत

१४ (टूडे ३ साठी)

चिपळूण-रत्नागिरीत
शरद पोंक्षेंची व्याख्याने

रत्नागिरी, ता. २१ ः चतुरंग प्रतिष्ठानने आज आणि उद्या (ता.२२ व २३)ऑगस्टला शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानांचे आयोजन केले आहे. भारताचे स्वातंत्र्य ः काल, आज आणि उद्या या विषयावर तसेच खास महाविद्यालयीन युवकांसाठी चला, आता तुमची पाळी! या शीर्षकाखाली चिपळूण आणि रत्नागिरी येथे ही व्याख्याने ''स्वातंत्र्याचे पूर्वरंग'' आणि ''श्रवणानंद'' या उपक्रमांतर्गत आयोजित केली आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्याचे पूर्वरंग या उपक्रमात चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कीर्तन, प्रवचन, व्याख्यान कार्यक्रम आयोजित केले जातात. ''स्वातंत्र्य'' या संकल्पनेचा सद्यपरिस्थितीत लागणारा अन्वयार्थ लक्षात घेऊन त्या विषयीचे स्पष्टास्पष्ट विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्याख्याने आहेत. मंगळवारी (ता. २२) ऑगस्टला चिपळूणमध्ये सकाळी ११ वा. डीबीजे महाविद्यालय येथे (फक्त महाविद्यालयातील युवकांसाठी) आणि संध्याकाळी ६ वा. ब्राह्मण सहाय्यक संघ येथे सर्वांसाठी ही व्याख्याने ठेवली आहेत. बुधवारी (ता. २३) ऑगस्टला रत्नागिरीत सकाळी ११.३० वा. गोगटे-जोगळेकर महाविद्यालय येथे फक्त महाविद्यालयातील युवकांसाठी आणि संध्याकाळी ६.१५ वा. रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालय येथे सर्वांसाठी दोन व्याख्याने होतील. पोंक्षे यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी सर्वांनी आवर्जून यावे, असे आवाहन चतुरंग संस्थेने प्रसिद्धीपत्रकात केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com