देवगडातील रंगभरण स्पर्धेत
वेदांत तवटे, विवेक परब प्रथम

देवगडातील रंगभरण स्पर्धेत वेदांत तवटे, विवेक परब प्रथम

24863
विवेक परब
24866
वेदांत तवटे

देवगडातील रंगभरण स्पर्धेत
वेदांत तवटे, विवेक परब प्रथम

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २१ ः येथील देवगड तालुका मुख्याध्यापक संघाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रंगभरण स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात वेदांत तवटे (मुणगे), आठवी ते दहावी गटात विवेक परब (मुणगे) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
स्पर्धेत तालुक्यातून सुमारे २३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. ज्या शाळेतील चित्रकला शिक्षकांनी १०० पेक्षा जास्त स्पर्धक स्पर्धेत सहभागी करून घेतले, अशा शिक्षकांनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. लवकरच बक्षीस वितरण होईल. स्पर्धेचे परीक्षण दीपिका पालकर (जामसंडे-खाकशी) व संदीप परब (तारामुंबरी) या शिक्षकांनी केले. सर्व यशस्वी स्पर्धक व मार्गदर्शक शिक्षकांचे तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दिलीप घरपणकर, सचिव माधव यादव यांच्यासह कार्यकारिणीने अभिनंदन केले आहे. स्पर्धेचा सविस्तर निकाल अनुक्रमे असा ः पाचवी ते सातवी गट-वेदांत तवटे (मुणगे), भार्गवी चौगुले (देवगड), कल्पक कोकरे (पडेल), उत्तेजनार्थ-साक्षी राठोड (तळेबाजार), आयुष साळुंखे (जामसंडे). आठवी ते दहावी गट-विवेक परब (मुणगे), प्रियंका परब (शिरगाव), आर्या चौगुले (देवगड), उत्तेजनार्थ-वैदेही नर (वाडा), तन्मय तिवाटणे (कोळोशी हडपीड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com