माजी सैनिकांचा सातार्ड्यात सन्मान

माजी सैनिकांचा सातार्ड्यात सन्मान

24889
सातार्डा : येथे माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उत्कर्षा पेडणेकर, मिलिंद जाधव, वासुदेव राऊळ, सोमा राऊळ, संदीप मुळीक आदी.

माजी सैनिकांचा सातार्ड्यात सन्मान

सावंतवाडीत वृक्षारोपण; ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अंतर्गत उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानांतर्गत पंचायत समितीतर्फे ग्रामस्तरावर सातार्डा ग्रामपंचायतीच्या वतीने माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये चंद्रकांत पवार, शांताराम पवार, सगुण गोवेकर व संतोष वेंगुर्लेकर यांच्यासह पोलिसपाटील रामदास जाधव, सरपंच संदीप प्रभू यांचा समावेश होता. तालुकास्तरावर येथील पंचायत समितीच्या जुन्या कार्यालयात विविध उपक्रम घेण्यात आले.
सातार्डा येथे कार्यक्रमास उपसरपंच उत्कर्षा पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य जाधव, वासुदेव राऊळ, ग्रामसेवक सोमा राऊळ, तलाठी संदीप मुळीक आदी उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप कार्यक्रमांतर्गत प्रत्येक राज्यामध्ये गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, यासाठी हे अभियान ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर राबविण्यात आले. या अभियानांतर्गत तालुकास्तरावर येथील पंचायत समितीच्या जुन्या कार्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वसुधावंदन कार्यक्रमामध्ये कर्मचारी निवासस्थानांच्या परिसरात भटवाडी येथे अमृतवाटिका तयार करण्यात आली. यावेळी परिसरात ७५ रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये साग, आवळा आदी विविध रोपांचा समावेश होता. यावेळी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, उपअभियंता सुदेश राणे, गट शिक्षणाधिकारी कल्पना बोडके, प्रभारी सहाय्यक गट विकास अधिकारी प्रशांत चव्हाण, कृषी अधिकारी शारदा नाडेकर, सहाय्यक प्रशासन अधिकारी विनायक पिंगुळकर आदी उपस्थित होते. गटविकास अधिकारी नाईक यांनी प्रास्ताविक केले. कृषी अधिकारी चव्हाण यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com