चिपळूण-डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या सूत्रधारांना पकडा

चिपळूण-डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या सूत्रधारांना पकडा

-rat२१p३०.jpg ःM२४८७९ चिपळूण ः तहसीलदारांना निवेदन देताना अंनिसचे पदाधिकारी.
-------------
डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या सूत्रधारांना पकडा
चिपळूण, ता. २१ ः डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने २०१६ मध्ये वीरेंद्र तावडे, ऑगस्ट २०१८ मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे व मे २०१९ मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे या खुनाच्या मागील सूत्रधारांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी येथील अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या वेळी अविनाश आखाडे, सुजाता महाडिक, दीपक महाडिक, जाफर गोठे, महेंद्र इंदुलकर, संजीव अणेराव, मल्हार इंदुलकर, अक्षता शर्णे, सुनिता गांधी, निखिल भोसले, रमाकांत सकपाळ, प्रा. विनायक होमकळस, माजी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, संजय कदम, क्षितिज पाथरे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com