राजापूर ः ओव्हरआर्म क्रिकेट,मित्रत्व पावस संघ विजेता

राजापूर ः ओव्हरआर्म क्रिकेट,मित्रत्व पावस संघ विजेता

ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत
पावसचा मित्रत्व संघ विजेता
राजापूर ः माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे पुरस्कृत रबर बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत पावसच्या मित्रत्व संघाने विजेतेपद पटकावले. रानतळेतील एम. सी. सी. संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. राजापूर शहरातील राजीव गांधी क्रीडांगणावर झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये ४० संघांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी पावस व रानतळे संघाने सर्वोत्तम खेळ करत अंतिम फेरीत पवेश केला होता. विजेत्या पावस संघाला नऊ हजार रुपये व आकर्षक चषक, उपविजेत्या रानतळे संघाला सहा हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज दानिश मुजावर (रानतळे), उत्कृष्ट गोलंदाज अहमद नाखवा (पावस), तर मालिकावीर म्हणून शुभम मुरकर (पावस) यांना गौरविण्यात आले. बक्षीस वितरण समारंभ माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या हस्ते झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com