चिपळुणात डेंग्यू साथ प्रतिबंधासाठी खबरदारी

चिपळुणात डेंग्यू साथ प्रतिबंधासाठी खबरदारी

४१ ( पान ३ साठीमेन)


- ratchl२१२.jpg ः
२३M२४९२३
चिपळूण ः शहरातील काविळतळी भागात औषध फवारणी करताना चिपळूण नागरी आरोग्यकेंद्राचे कर्मचारी.
--------

चिपळुणात ‘डेंगी’बाबत प्रशासन सतर्क

उपाययोजनेसह औषध फवारणी;महिन्यात १६ रुग्ण ,सहाजणांवर रुग्णालयात उपचार सुरू

चिपळूण, ता. २१ ः पावसाळ्यात साथीचे रोग डोके वर काढत असतात. चिपळूण शहरासह तालुक्यात ताप, सर्दी, खोकल्यासह डेंगीची लागण झालेले रुग्णही सापडू लागल्याने आरोग्यविभाग सतर्क झाला आहे. गेल्या तीन महिन्यात १६ रुग्ण आढळले असून, सहा रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. सद्यःस्थितीत ६ रुग्ण सरकारी दवाखान्यांसह खासगी हॉस्पिलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. डेंगीचे रुग्ण आढळू लागल्याने चिपळूण तालुका आरोग्यविभाग व नागरी आरोग्यकेंद्र यांच्यामार्फत सध्या डासोत्पती ठिकाणांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. चिपळूण तालुक्यात डेंगीची साथ पसरू नये यासाठी आरोग्य विभागामार्फत विशेष खबरदारी घेतली जात आहे. जून महिन्यात डेंगीसदृश ३५ रुग्णांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जुलै महिन्यात तपासणी केलेल्या २२ जणांपैकी तिघांना डेंगीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले तर ऑगस्ट महिन्यात ४६ रुग्णांपैकी सहा रुग्ण डेंगीचे आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक, आरोग्य कर्मचारी यांच्याकडून साथरोगाच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. डेंगीसदृश रुग्ण तुरळक प्रमाणात चिपळूण शहरात आढळून आले आहेत. त्यानुसार डासोत्पतीची कायमस्वरूपी आणि हंगामी ठिकाणे येथे गप्पीमासे सोडण्याची मोहीम राबवण्यात आली. कार्यक्षेत्राप्रमाणे हस्तपत्रिका वाटप करण्यात आली. ज्या भागात डेंगीचे रुग्ण सापडले आहेत तेथे आरडीके कीटमार्फत तपासणी करून आणि आरडीके तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आल्यास त्यांची पुढील टेस्टसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे रक्तजल नमुने पाठवण्यात आले. सध्या बाधित क्षेत्रामध्ये गृहभेटीमध्ये आरोग्य शिक्षण व उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. चिपळूण नागरी आरोग्यकेंद्रामध्ये टेलिफॉस, प्रायराथॉम्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत तसेच धूरफवारणी, औषध फवारणी केली जात आहे.
या सर्व मोहिमेसाठी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, चिपळूण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा हिवताप अधिकारी संतोष यादव, वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहीत हाडोळीकर, पर्यवेक्षक एस. वाय. जानवलकर, एस. व्ही. चव्हाण, एम. वाय. तायडे, बी. पी. जाधव यांनी सहभाग घेतला होता.
---
चौकट
आठवड्यातून एकदा हे करावे

ड्रम किंवा उतर पाण्याची भांडी पूर्णपणे रिकामी करून स्वच्छ धुवून त्यावर झाकण लावावे. फुलदाणी, कुंडी, मनीप्लांट आदीमधील पाणी नियमित बदलावे. घराभोवती ज्यामध्ये पावसाचे पाणी साचू शकेल अशा निरूपयोगी वस्तू ठेवू नये. त्या नष्ट कराव्यात. ज्या वस्तू फेकण्यायोग्य नाहीत त्या उलट्या करून ठेवाव्यात जेणेकरून पावसाचे पाणी त्यात साचणार नाही.
- डॉ. ज्योती यादव, तालुका आरोग्य अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com