पावशीतील अपघातात
ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पावशी येथे एकाचा मृत्यू

पावशीतील अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू पावशी येथे एकाचा मृत्यू

पावशीतील अपघातात
ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
महामार्गावर दुचाकी-मोटार धडक; एक जखमी

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ ः दुचाकी आणि मोटार यांच्यात आज झालेल्या अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. अरुण शंकर घारे (वय ६५, रा. पावशी-बोरभाटवाडी) असे त्यांचे नाव आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर पावशी ग्रामपंचायतजवळ सकाळी साडेआठच्या सुमारास अपघात झाला. घारे दुचाकी चालवत होते. त्यांच्या मागे बसलेले दत्ताराम पावसकर (७० सध्या रा. मुंबई, मूळ पावशी-बोरभाटवाडी) जखमी आहेत. त्यांना येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः घारे मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी ग्रामपंचायत येथील दुचाकीने कुडाळच्या दिशेने जात होते. त्यांच्या सोबत पावसकर होते. प्रणव जयंत यादव (रा. रत्नागिरी) मोटारीतून रत्नागिरीच्या दिशेने जात होते. दुचाकी समोर येत असल्याची दिसताच त्यांनी गाडी आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरधाव मोटारीची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. दुचाकीस्वार घारे थेट दुभाजकावर जाऊन आदळले तर पावसकर रस्त्यातच पडले. दोघांना कुडाळ येथे नेण्यात आले. मात्र, घारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्थानिक बंटी तुळसकर यांनी लगेच अपघतास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात नेले. दरम्यान, पावसकर नागपंचमीसाठी मुंबईहून पावशी मूळगावी आले होते.


कुडाळ ते पावशी या पाच किलोमीटरच्या टप्प्यात पाच अनधिकृत मिडलकट होते. त्यातील चार बंद केले होते; मात्र, ग्रामपंचायतसमोरील मिडलकट बंद केलेला नाही. उर्वरित बंद चारपैकी दोन फोडून पुन्हा सुरू केले आहेत. पिंगुळी, आरएसएन चौक येथील मिडलकटमुळे अनेक अपघात घडले आहेत. पावशी ग्रामपंचायतसमोरील मिडलकट बंद करण्यात येईल, अशी माहिती पावशी सरपंच यांनी दिली. याबाबत कुडाळ पोलिस प्रशासनाकडे सूचना केली असून महामार्ग ठेकेदार कंपनी कार्यवाही करेल, असे सरपंच यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com