

१६ (टूडे २ साठी)
(२२ ऑगस्ट टुडे ३)
आरोग्य विचार - होमीओपॅथीचा--------लोगो
rat२८p७.jpg ः
२३M२६३३४
डॉ. विश्वजीत मानकर
दमा (अस्थमा) शरीरामध्ये छातीच्या पोकळीत असलेल्या फुप्फुस या इंद्रियाचे कार्य अत्यंत महत्वाचे आहे. नाकावाटे घेतलेला प्राणवायू आणि शरीरामध्ये तयार झालेली अशुद्ध हवा यांचे आदानप्रदान फुप्फुसांमध्ये होत असते. फुप्फुसाची रचना ही छोट्या छोट्या फुग्यांनी तयार झालेली आहे आणि या द्वारे वरील कार्य घडत असते.
----
दमा आणि होमिओपॅथिक उपाययोजना
अस्थमा या रोगामध्ये फुप्फुसांमध्ये श्लेष्मा (कफ) तयार होत असतो. फुप्फुसातील हवेच्या फुग्यांभोवती हा श्लेष्मा जमा झाल्याकारणाने प्राणवायू व अशुद्ध हवा यांच्या आदानप्रदानामध्ये अडथळा निर्माण होतो. परिणामी, नाकावाटे घेतलेला प्राणवायू अपुरा पडतो आणि तो फुप्फुसांमध्ये खेचण्याचा प्रयत्न होत असतो. परिणामस्वरूपी दम लागणे हे लक्षण दिसते, याला आपण दमा किंवा अस्थमा म्हणतो. बऱ्याचदा हा आजार अनुवंशिक असतो. बाल अस्थमा अर्थात वयाच्या साधारण सातव्या वर्षापर्यंत कारणपरत्वे उद्भवणारी अस्थमाची लक्षणे आणि प्रौढांमध्ये, वृद्धांमध्ये उद्भवणारा अस्थमा अशा स्वरूपात निरनिराळ्या वयोगटामध्ये निरनिराळ्या कारणाने उद्भवणारा अस्थमा.
सर्वप्रथम आपण कारणांचा विचार करू. बहुतांशी रुग्णांमध्ये याचे कारण थंड हवा, थंड वातावरण, थंड पदार्थांचे सेवन, थंड आणि दमट घरातील वास्तव्य, धूळ किंवा धूर, अतितेलकट पदार्थांचे सेवन, बिडी, सिगारेटद्वारे फुप्फुसांमध्ये प्राणवायूऐवजी कार्बनडाय ऑक्साइड (दूषित धूर) जाणे हवामानामध्ये अचानक होणारे बदल इत्यादी. याचबरोबर अनुवंशिक असणारा अस्थमा ही कारणे सामान्यपणे दिसून येतात. निरनिराळ्या रोगांमध्ये फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होते, याचा ढोबळमानाने आपण विचार करू या. उदाहरणार्थ, क्षयरोगासारख्या जुनाट फुप्फुसाच्या रोगामध्ये फुप्फुसाची कार्यक्षमता कमी झालेली असते. अशावेळी सुद्धा दम लागणे हे लक्षण आढळते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास रुग्णाला अन्य लक्षणांबरोबरच दम लागणे हे लक्षण आढळते. जलोदरामध्ये पोटातील वाढलेल्या पाण्याचा दाब हृदय व पोट विभक्त करणारा Diaphragm या पडद्यावर येऊन फुप्फुसांवर दाब येतो व त्याच्या कार्यामध्ये व्यत्यय येऊन दम लागणे, हे लक्षण आढळते. हृदयरोगामध्ये आढळणारा कार्डिॲक अस्थमा जो हृदयरोगाच्या अन्य लक्षणांसोबत दिसून येतो. उदाहरणादाखल आपण काही रोग आणि दम लागणे या लक्षणांचा विचार केला.
होमिओपॅथिक शास्त्र या रोगाची चिकित्सा (उपचार) करत असताना कशाप्रकारे औषधयोजना असते, याचा विचार करू. होमिओपॅथिक शास्त्रानुसार, कारणांचा विचार औषधी योजना करताना केला जातोच; परंतु अत्यंत महत्वाची आणि वेगळी बाब म्हणजे औषधयोजना करत असताना रुग्णाची असणारी रोगप्रतिकारशक्ती वाढवून संबंधित रोगकारणांशी लढण्याची प्रत्येक जीवमात्राची प्रतिकारशक्ती वाढवणे हे होमिओपॅथिक औषधांच्या निराळेपणाचे वैशिष्ट्य आहे. सामान्यपणे दम्यासाठी अॅलर्जिक अस्थमा असे निदान करून रुग्णाला संबंधित अॅलर्जिक पदार्थांपासून किंवा गोष्टींपासून दूर राहण्याचे सुचवले जाते; परंतु होमिओपॅथिक शास्त्र हे या कारणांशी लढण्याची रुग्णांमध्ये असणारी नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवून रुग्णांमध्येच नैसर्गिकरित्या लढण्याची क्षमता निर्माण करते. होमिओपॅथिक शास्त्रामध्ये दम्यासारख्या रोगासंबंधी असणाऱ्या कारणांनुसार औषधयोजना असते ती कशाप्रकारे असते, याचा आपण विचार करूया. थंड हवा किंवा थंड पदार्थांचे सेवन केल्यानंतर रुग्णाला अचानक दम्याचा त्रास सुरू होत नाही तर आधी नाकातून सर्दी सुरू होईल, शिंका येतील, नाक बंद होणे अशा स्वरूपाची लक्षणे दिसतात. ही लक्षणे दबवली गेल्यास म्हणजे नाकातून होणारा स्राव हा तत्काळ विरुद्ध उपचाराने बरा करण्याचा प्रयत्न झाला तर फुप्फुस आणि श्वसनसंस्थेमध्ये तयार होणारा श्लेष्मा वाळतो आणि श्वसनक्रियेमध्ये अडथळा निर्माण करतो. होमिओपॅथिक शास्त्रानुसार, हा नाकातला स्राव जलदगतीने पूर्णतः बाहेर काढून त्याच्या निर्माणप्रक्रियेत प्रतिबंध करणे हे आहे. वातावरणात होणारा बदल या कारणाचा विचार होमिओपॅथिक शास्त्र निराळ्या पद्धतीने करते. प्रत्येक बदलणाऱ्या वातावरणाला रुग्ण सक्षमपणे सामोरा जाण्याची क्षमता निर्माण करणे, ही प्रक्रिया होमिओपॅथिक शास्त्र करते. या गोष्टीचा केवळ आपण होमिओपॅथिक उपचारपद्धतीचे कार्य कशाप्रकारे होते, हे सर्वसामान्य वाचकाला कळावे यासाठी केला; परंतु होमिओपॅथिक उपचारपद्धतीनुसार रोग लक्षणांचा अभ्यास करण्याची पद्धत म्हणजे मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे केवळ एका रोगाचा विचार न करता अगदी डोक्याच्या केसापासून पायांच्या नखांपर्यंत आणि रुग्णाची मनःस्थिती इथवर केला जातो आणि आणि असा विचार केल्यासच केवळ होमिओपॅथिक नियमावली आणि तत्त्वप्रणालीद्वारे उपचार केला गेला आहे, असे म्हणता येईल. हे सर्व करत असताना होमिओपॅथिक शास्त्राच्या मूळ तत्त्वज्ञानानुसार केवळ एक आणि एकच आणि आवश्यकतेनुसार कमीत कमी औषधमात्रा अवलंबलीच पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.