सिंधुदुर्गनगरीत धनुर्विद्या स्पर्धेस प्रतिसाद

सिंधुदुर्गनगरीत धनुर्विद्या स्पर्धेस प्रतिसाद

Published on

27778
ओरोस ः जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेतील खेळाडूंसह मान्यवर.


धनुर्विद्या स्पर्धेस सिंधुदुर्गनगरीत प्रतिसाद

‘आर्चरी’चा उपक्रम; विजेत्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ ः पुणे येथील राज्याचे क्रीडा युवक सेवा संचालनालय, क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग व आर्चरी असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा कार्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा झाली. स्पर्धेत विविध विभागांतील खेळाडूंची विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली.
स्पर्धेच्या उद्‍घाटन प्रसंगी वरिष्ठ पोलिस अधिकारी श्री. कोल्हटकर, क्रीडा अधिकारी विजय शिंदे, आर्चरी असोसिएशनचे सचिव अमित जोशी, क्रीडा शिक्षक अच्युत वणवे, आर्चरी असोसिएशनचे अ‍ॅड. अक्षय कुळकर्णी, पंच अविराज खांडेकर, घावरे, क्रीडा समन्वयक वैभववाडी क्रीडाशिक्षक शेलेंद्र मुळीक, कमलेश गोसावी, पंच साईराज सावंत आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध प्रशालांतील धनुर्विद्या खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड झालेले खेळाडू असे ः १४ वर्षांखालील मुले-साई मोहिते (पोदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवली), उत्कर्ष सावंत (यशवंराव भोसले स्कूल, सावंतवाडी), अस्मित मुळीक (कळसुली इंग्लिश स्कूल), हृतुज गोसावी (माध्यमिक विद्यामंदिर, असरोंडी, मालवण), १४ वर्षांखालील मुली-अक्सा शिरगावकर (पोदार इंटरनॅशनल, कणकवली), वैखरी सावंत (पोदार इंटरनॅशनल कणकवली), अर्शिया काजरेकर (यशवंतराव भोसले इंटरनॅशनल, सावंतवाडी), श्रीया वंजारी (यशवंतराव भोसले इंटरनॅशनल, सावंतवाडी), १७ वर्षांखालील मुले-आदित्य वणवे (विद्यामंदिर प्रशाला, कणकवली), निहाल मोंडकर (माधवराव पवार विद्यालय, कोकीसरे, वैभववाडी), प्रज्योत जोईल (आयडील इंग्लिश स्कूल कणकवली), गौरांग जैतापकर (माधवराव पवार विद्यालय, वैभववाडी), १७ वर्षांखालील मुली-चैत्राली पाटील (माधवराव पवार विद्यालय, वैभववाडी), धैरया गावकर (मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी), प्रगती हलनकर (यशवंतराव भोसले इंटरनॅशनल सावंतवाडी), नीतूकुमारी देवासी (माधवराव पवार विद्यालय वैभववाडी). यशस्वी स्पर्धकांचे जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, आर्चरी असोसिएशनचे उपाध्यक्ष भालचंद्र कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com