देवी भगवती चव्हाटा मंदिराचे नूतनीकरण

देवी भगवती चव्हाटा मंदिराचे नूतनीकरण

28629
मुणगे ः आडबंदरवाडी येथील देव चव्हाटा मंदिर.


देवी भगवती चव्हाटा मंदिराचे नूतनीकरण

सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ६ ः येथील देवी भगवती चव्हाटा मंदिर, श्रीकृष्ण प्रासादिक समाज आडबंदर यांच्या देवी भगवती चव्हाटा मंदिराचे नुतनीकरण केले असून त्या मंदिरातील देव चव्हाटा पाषाण पुर्नस्थापना व वास्तूशांती (होम) तसेच देव चव्हाटा (मांड) स्थापनेला १२५ वर्षे पूर्ण होत असल्याने नुकतेच विविध धार्मिक कार्यक्रम मंत्रोच्चाराने भक्तीमय वातावरणात पार पडले.
मुणगे-आडबंदरवाडी येथील देवी भगवती चव्हाटा मंदिराचे नुतनीकरण करण्यात आले असून या मंदिरातील देव चव्हाटा पाषाण पुर्नस्थापना व वास्तुशांती तसेच देव चव्हाटा मांड स्थापनेला १२५ वर्षे पुर्ण होत असल्याने त्या निमित्ताने नुकतेच पुरोहितांच्या मंत्रोच्चार व पंचामृताने इमारत शुध्दीकरण करण्यात आले. देव चव्हाटा पाषाणाचे पुरोहितांच्या हस्ते विधीवत पुजन करून पुर्नस्थापना करण्यात आली. मंदिराची वास्तूशांती करण्यात आली. दुपारी महाप्रसाद, सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम करण्यात आला. यासाठी परिसरातील महिला उपस्थित होत्या. रात्री भजने झाली. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोच्चाराने मंदिर परिसरामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. दुसऱ्या दिवशी श्री सत्यनारायणाची महापूजा महाआरती, तीर्थप्रसाद महाप्रसाद, रात्री दिंडी भजन झाले. कार्यक्रमासाठी आडबंदरवाडी येथील मुंबईकर ग्रामस्थ उपस्थित होते. मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते आंनद मालाडकर व आडबंदरवाडीतील श्रीकृष्ण प्रासादिक समाज यांचे कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमासाठी फार मेहनत घेतली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ. रविना मालाडकर, मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत मालडकर, कृष्णा जोशी, दिपक वाघ, श्रीकृष्ण वाघ, चंद्रशेखर जोशी, सुधाकर कुरंगे, हेमंत जोशी, उमेश तळवडकर, रामचंद्र मालडकर, रमाकांत बापर्डेकर, पांडुरंग बापर्डेकर, केमराज जोशी, आनंद जोशी, कमलाकर सारंग, मोहन बांदेकर, प्रकाश बांदेकर, रवी जोशी, विश्वनाथ वाघ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com