बारा कोतवालांची सावंतवाडीत निवड
बारा कोतवालांची
सावंतवाडीत निवड
सावंतवाडी ः तालुक्यात १४ गावांमध्ये कोतवाल निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. याअंतर्गत काल (ता. ११) एकूण १२ जणांची निवड करण्यात आली. दोन गावांत उमेदवारी अर्ज प्राप्त झाले नाहीत. यात मळगाव-रोशनी जाधव, सांगेली-वर्षा ठाकूर, चौकुळ-पूर्वा ठाकूर, माडखोल-रंजना गोसावी, तळवडे-धीरज गावडे, सातार्डा-गौरेश कोरगावकर, इन्सुली-सुनीता हळदणकर, सावंतवाडी शहर-सखाराम वराडकर, तळवणे-दिनेश पेडणेकर, डेगवे-दीक्षा कोरगावकर, निगुडे-तुषार सावंत, असनिये-निरंजन परब यांची निवड करण्यात आली. कुणकेरी व चराठा गावांसाठी एकही अर्ज प्राप्त नाही. कोतवाल पदासाठी आरक्षण टाकण्यात आले होते. लेखी परीक्षेनंतर ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी व निवड समितीचे अध्यक्ष प्रशांत पानवेकर व सचिव तहसीलदार मोनिका कांबळे यांनी दिली.
---
परब समाजबांधवांची
२४ ला कुडाळात सभा
बांदा ः परब मराठा समाज मंडळाच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत असल्याने यावर्षी २२, २३ व २४ डिसेंबरला कणकवली येथे हिरक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या नियोजनासाठी २४ सप्टेंबरला सकाळी दहाला कुडाळ येथील सावंतवाडी मराठा समाज हॉलमध्ये परब समाजाची मुंबई कार्यकारिणी व सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी तसेच समाजबांधवांची एकत्रित नियोजन बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत हिरक महोत्सवाचे नियोजन करण्यात येणार आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात महोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी हिरक महोत्सवी वर्ष असल्याने मोठ्या दिमाखात व राज्यस्तरीय मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. नियोजन बैठकीसाठी समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन परब मराठा समाजाचे जिल्हा संघटक विनायक परब यांनी केले आहे.
.................
बांद्यात शिवसेनेतर्फे
गणेश आरास स्पर्धा
बांदा ः बांदा शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर मित्रमंडळातर्फे खास गणेशोत्सवनिमित्त प्रभाग क्रमांक ५ मर्यादित घरगुती गणेश सजावट आणि गणेशमूर्ती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा प्रभाग ५ मध्ये हॉस्पिटल कट्टा, सुतारवाडी, काळसेवाडी, आंबेडकरनगर यांच्यासाठी मर्यादित आहे. गणेश आरास सजावट स्पर्धेसाठी ४ हजार ४४४, २ हजार २२२, १ हजार ५५५ रुपये, गणेशमूर्ती सजावट स्पर्धेसाठी २०००, १५०० व १००० रुपये अशी अनुक्रमे पारितोषिके आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रशांत कोचरेकर, विठ्ठल उर्फ भाऊ वाळके यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामपंचायत सदस्या देवल येडवे यांनी केले आहे.
--
कानडे, धुरींचा आज
इन्सुली येथे सत्कार
ओटवणे ः सावंतवाडी तालुक्यातील भजनी कलावंतांच्यावतीने उद्या (ता. १३) इन्सुली आरटीओ चेकनाका येथील श्री गणपती मंदिरात सायंकाळी चारला सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष कानडे व सदस्य राजाराम धुरी यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सावंतवाडी तालुक्यातील पारंपरिक भजनी मंडळे, भजनी बुवा, पखवाज व तबला वादक, कोरस यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी तालुक्यातील भजनी कलावंतांच्यावतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.