संक्षिप्त

संक्षिप्त

rat१०p४०.jpg ःKOP२३M३७०५३ राजापूर ः जलतरण स्पर्धेतील विजेते प्रेरणा मोंडे आणि संस्कार शिंदेदेसाई.

प्रेरणा मोंडे, संस्कार शिंदेदेसाईंचे जलतरणात यश
राजापूर ः तालुक्यातील ओणी येथील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रेरणा मोंडे आणि शांताराम भट इंग्लिश स्कूलचा संस्कार शिंदेदेसाई यांनी जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये यश संपादन केले आहे. या यशस्वी कामगिरीमुळे त्यांची उद्या (ता. ११) होणार्‍या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रेरणाने ४०० मी. फ्री स्टाईल, २०० मी. फ्री स्टाईल व १०० मी. ब्रेस्टस्ट्रोक या तिनही प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक तर संस्कारने ४०० मी. फ्री स्टाईल या प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांना अ‍ॅड. एकनाथ मोंडे, मोंडे, डॉ. शैलेश शिंदेदेसाई, शुभांगी शिंदेदेसाई या पालकांसह माजी शिक्षक नाना मुजूमदार, क्रीडाशिक्षक शिंदेदेसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरले आहे. या यशाबद्दल त्यांचे संस्थाध्यक्ष वासुदेव तुळसणकर, संस्था कार्याध्यक्ष प्रदीप संसारे, उपाध्यक्ष गोसावी, सचिव जानस्कर, शाळा समिती अध्यक्ष वागळे, संचालक मंडळ, शिक्षकवृंद, विद्यार्थी यांच्यासह तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.
------------

rat१०p३९.jpg-
२३M३७०४२
रत्नागिरी- छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची ३८८ वी जयंती माधव निवास साळवी स्टॉप येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

जिवाजी महाले यांची ३८८ वी जयंती उत्साहात

रत्नागिरी, ता. ११ ः छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक शूरवीर जिवाजी महाले यांची ३८८वी जयंती माधव निवास साळवी स्टॉप येथे उत्साहात साजरी झाली. कार्यक्रमाच्या सुरवातीला शूरवीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमात दिवंगत बांधव व शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत जाधव, समर्थ नाभिक समाजसंघाचे सुनील चव्हाण, पांडुरंग मोरे, दिनेश चव्हाण, पंकज कदम, मोहन हातखंबकर, टायगर सेनेचे कोकण अध्यक्ष मंदार शिंदे, नितीन घोसाळकर, तुषार घोसाळकर, श्रावणी घोसाळकर, नाभिक महिलाध्यक्षा निकिता जाधव, अश्विनी चव्हाण, रंजना चव्हाण, रश्मी शिंदे, स्वाती हातखंबकर, ज्योत्स्ना शिंदे, संपदा यादव, वनीता चव्हाण आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हापातळीवर तलवारबाजीमध्ये निवड झालेल्या तुषार घोसाळकर तर चित्रकला, घोषवाक्य स्पर्धेत पारितोषिक मिळवलेल्या श्रावणी घोसाळकर यांचा सत्कार करण्यात आला.
----------

Rat१०p४२.jpg ः
२३M३७०५९
भिंगळोली ः ग्रामीण रुग्णालयात शिबिरात तपासणीसाठी आलेले तालुक्यातील दिव्यांग बांधव व आरोग्य कर्मचारी.

दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबीराला प्रतिसाद

मंडणगड, ता. ११ ः रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाने मंडणगड पंचायत समिती यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या विद्यमाने १० ऑक्टोंबरला भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिरास तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात अस्थिव्यंग, अंध, मतिमंद, कर्णबधीर, मूकबधीर, अध्ययन अक्षम यांची तपासणी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचा आरंभ आमदार योगेश कदम, जिल्हा शल्य चिकित्सक संघामित्रा फुले, गटविकास अधिकारी विशाल जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास चरके, डॉ. सगरे, डॉ. पभाकर भावठाणकर, रूग्णकल्याण समिती सदस्य विनोद जाधव, माजी जि.प. सदस्या अस्मिता केंद्रे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या शिबिरात तालुक्यातील ४५०हून अधिक दिव्यांगाची तपासणी करण्यात आली. यंत्रणेच्या दिव्यांगाकरिता आयोजित करण्यात आलेले शिबीर दापोली येथे होणार होते; मात्र आमदार योगेश कदम यांनी येथील दिव्यांगांची प्रवासाची अडचण लक्षात घेऊन हे शिबिर तालुकापातळीवर मंडणगड येथे होण्यासाठी विशेष पाठपुरावा करून तालुकापातळीवर शिबिरासाठी यंत्रणेस कार्यप्रवृत्त केल्याने दिव्यांगाची अडचण दूर झाल्याने आमदारांचे विशेष आभार मानण्यात आले.

----------

Rat१०p४१.jpg ः
२३M३७०६७
मंडणगड ः उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन करताना रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे व अन्य.

मंडणगड शहरात हवा डॉ. बाबासाहेबांचा पुतळा

मंडणगड, ता. ११ ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका मंडणगड यांच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन ८ ऑक्टोबरला सादर करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मंडणगड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात यावा तसेच नव्याने निर्माण होणाऱ्या जिल्ह्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव असणारे आंबडवे हे नाव देण्यात यावे, याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्र्यांशी येथील कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष चर्चाही केली. या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस तथा मंडणगड नगरपंचायत नगरसेवक आदेश मर्चंडे, जिल्हा संघटक विजय खैरे, सोवेली उपसरपंच व तालुका युवक अध्यक्ष संकेत तांबे, तालुका युवक सरचिटणीस संकेश कासारे, युवक कार्यकर्ते योगेश कासारे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
--------------

Rat१०p४३.jpg ः
P२३M३७०६०
मंडणगड ः मुश्ताक दाभिळकर यांना नियुक्तीचे पत्र देताना आमदार योगेश कदम.

शिवसेना अल्पसंख्यांक सेल तालुकाप्रमुखपदी दाभिळकर

मंडणगड ः नगरसेवक मुश्ताक दाभिळकर यांची शिवसेनेच्या मंडणगड तालुका अल्पसंख्यांक सेलचे तालुकाप्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. आमदार योगेश कदम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. त्यांचे तालुक्यातून विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com