जिल्ह्यात लवकरच विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्र

जिल्ह्यात लवकरच विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्र

37471
सिंधुदुर्गनगरी ः करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दाखविताना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर. सोबत प्रभाकर सावंत, डॉ. प्रसाद देवधर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे आदी.


जिल्ह्यात लवकरच विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्र

करारनामा पूर्ण ः पहिल्या टप्प्यात सुतारकामाचे धडे

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १२ ः जिल्ह्यातील स्थानिक सुतार काम करणारे व इतर कारागिर यांना प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रगत प्रशिक्षण देणे व त्यायोगे त्यांच्या कारागीरीची प्रगती करणे तसेच त्यांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या सहकार्याने विश्वकर्मा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे.
त्यासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्गसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, कॉज टू कनेक्ट, पुणे (Cause to connect, Pune) संस्थेचे अनिरुद्ध बनसोड, धी. कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था, आणि भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांच्यामध्ये करारनामा करण्यात आला. हे प्रशिक्षण पहिल्यांदा सुतार कामाबाबत असणार आहे. याचा कालावधी ६ महिन्यंचा असेल. यासाठी पुणे येथील कॉज टू कनेक्ट संस्थेने तयार केलेला अभ्यासक्रम प्रशिक्षणासाठी घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग लाभार्थी निवड करुन देणार असून प्रशिक्षणासाठी सुरवातीला एकदाच १० लाख रुपये एवढ्या कमाल मर्यादेपर्यंत साहित्य खरेदीसाठी मदत व सहकार्य करणार आहे. या प्रशिक्षणासाठी धी. कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था जागा उपलब्ध करुन देणार असून त्यासाठी इमारत बांधून उपलब्ध करुन देणार आहे. यामध्ये भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप ही या सर्व प्रक्रीयेमध्ये समन्वय यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे. प्रशिक्षीत लोकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी सिंधुदुर्ग बँक व शासन योजना समन्वय साधने तसेच आवश्यक तेथे संबंधित लाभार्थ्यांना मदत व सहकार्य करणार आहे. भविष्यात या योजनेसाठी प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याबाबत नियोजन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com