कट्टा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना
‘चांद्रयान-३’ मोहिमेवर व्याख्यान

कट्टा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना ‘चांद्रयान-३’ मोहिमेवर व्याख्यान

37472
कट्टा ः मार्गदर्शक देविदास पवार यांचा सत्कार करताना संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर सोबत अन्य.

कट्टा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना
‘चांद्रयान-३’ मोहिमेवर व्याख्यान

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १२ ः कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वराडकर हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज आणि वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुल यांच्या संयुक्त सहकार्याने भारताचे अभिमानास्पद ‘चांद्रयान -३ मोहीम’ संदर्भातील विद्यार्थ्यांसाठीचे मार्गदर्शक आणि उपयुक्त विशेष व्याख्यान हायस्कुलच्या सिद्धिविनायक सभागृहात झाले.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर मुंबईमधील शास्त्रज्ञ डॉ. अमित लाड यांचे हे विशेष व्याख्यान शाळेच्या आणि पंचक्रोशीतील इतरही विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले होते. या व्याख्यानाच्या आयोजनात कुणकवळे गावचे सुपूत्र रिसर्च अधिकारी देविदास पवार यांचे विशेष सहकार्य प्राप्त झाले. टी. आय. एफ. एस. चे अदिकारी यश वेद आणि विजय कदम यांचेही या व्याख्यानात बहुमूल्य सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमानंतर झालेल्या प्रश्नोत्तरात चौकसपणे सहभाग घेऊन या चांगल्या कार्यक्रमाला अधिक शोभा आणली. अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. अमित लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी उपस्थित मुलांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. या व्याख्यानाला संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनील नाईक, सचिव विजयश्री देसाई, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, शाळेचे मुख्याध्यापक संजय नाईक, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्रिन्सिपल ऋषिकेश नाईक, पर्यवेक्षिका देवयानी गावडे, दोन्हीही युनिटचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक, आजी-माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते. शाळेचे विज्ञान शिक्षक प्रकाश कानूरकर यांनी सूत्रसंचालन केले. स्टेज व्यवस्थापन शिक्षक श्री भाट यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com