आशा व गटप्रवर्तक महिलांचा 18 पासून बेमुदत संप

आशा व गटप्रवर्तक महिलांचा 18 पासून बेमुदत संप

६ (टूडे पान २साठीमेन)

आशा,गटप्रवर्तक महिलांचा १८ पासून संप

संघटनेचा निर्धार ; आरोग्य केंद्रनिहाय निवेदन देण्यास सुरूवात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्‍यांचा दर्जा व त्यांचे वेतन मिळावे, ऑनलाईन कामाची सक्ती बंद करा, यासह विविध मागण्यांसाठी महिलांनी १८ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आशा व गटप्रवर्तकांकडून दिले जात आहे. तसेच ऑनलाईन कामाची सक्ती केल्यास पोलीसात तक्रार करू असा इशारा महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
गेली अनेक वर्षे आशा स्वयंसेवक आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. वारंवार मोर्चा काढला जात आहे. मात्र त्यांना म्हणावे तसे यश येत नाही. आता पुन्हा त्यांनी मागण्यांसाठी एल्गार केला आहे. १६ ऑक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसे निवेदनही प्रशासनाला दिले आहे. आरोग्य अभियानांतर्गत दोन वर्षापूर्वी आशांना स्मार्ट मोबाईल देण्याचा निर्णय झालेला आहे. परंतु, अद्यापही आशा व गटप्रवर्तक महिलांना मोबाईल मिळालेला नाही. त्यामुळे पीएनजी ई कार्ड काढण्याचे काम आभा कार्ड काढणे, लाभार्थ्यांना डॉक्टरांच्याबरोबर ऑनलाईन संपर्क करुन देणे याशिवाय अनेक कामे आशा व गटप्रवर्तक महिलांना सक्तीने करावयास लावले जात आहे. आजही आशा व गटप्रवर्तक जमेल तसे ऑनलाईन पध्दतीने काम करीत आहेत. परंतु, ऑनलाईन काम करण्यासाठी आशा व गटप्रवर्तक महिलांना दरमहा फक्त १०० रुपये रिचार्ज भत्ता दिला जातो. संपूर्ण महिन्यामध्ये १०० रुपये रिचार्जवर मोबाईल सुरु राहील अशा कंपनीचे नाव सांगण्यास राष्ट्रीय आरोग्य अभियान तयार नाही. परंतु, आशा व गटप्रवर्तक महिलांना मात्र दरमहा ४०० रुपये चा. रिचार्ज मारल्याशिवाय ऑनलाईन काम करता येत नाही. म्हणजेच स्वत:चेच ३०० रु. आशा महिलांना द्यावे लागत आहेत, असे निवेदनात नमूद केले आहे.

मानधनात वाढ नाही
आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात येईल. परंतु, प्रत्यक्षात अद्याप काहीही वाढ दिलेली नाही. या संदर्भात लांजा तालुक्यात आशा व गटप्रवर्तक महिलांचा मेळावा झाला. त्यामध्ये संपावर जाण्याबाबत चर्चा झाली, असे शंकर पुजारी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com