- लेकीच्या सक्षमीकरणासाठी संरक्षणाची सावली

- लेकीच्या सक्षमीकरणासाठी संरक्षणाची सावली

१७ (पान २ साठी)

‘लेक लाडकी’ने महिला सक्षमीकरण

सुजाता साळवी ; महायुती सरकारची योजना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : महायुती सरकारची लेक लाडकी योजना राज्यात लागू होत असल्याबद्दल भाजपाच्या दक्षिण रत्नागिरी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी यांनी आनंद व्यक्त केला. यामुळे राज्यासह रत्नागिरी जिल्ह्याला या योजनेचा फायदा होऊन असंख्य गरीब कुटुंबातील मुलींचे भविष्य उजळणार आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
साळवी म्हणाल्या की, घोषणा करायची आणि त्याची अंमलबजावणी करायची ही नवी परंपरा भाजपने सुरू केली. राज्याच्या २०२३- २४ च्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली लेक लाडकी योजना राज्यात लागू करण्याचा सरकारचा निर्णय महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाचे अभियान बळकट करणारा आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वित्तमंत्री या नात्याने राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ''लेक लाडकी योजने''चा तपशील जाहीर केला होता. आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या पूर्वसंध्येला आणि दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही योजना जाहीर करून देवेंद्र फडणवीस यांनी या संकल्पची पूर्तता केली आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि गरीब कुटुंबातील मुलींना लखपती बनवून स्वतःच्या क्षमतेवर शिक्षणाच्या सर्व संधी प्राप्त करता याव्यात यासाठी आखलेल्या या योजनेद्वारे वयाच्या १८ व्या वर्षी मुलीच्या खात्यात एक लाखांपर्यंतची रक्कम जमा करण्यात येणार आहे. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याच्या क्रांतिकारी निर्णयामुळे राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणाचा मोठा टप्पा गाठला गेलाय. केंद्रातील मोदी सरकारने अलीकडेच महिलांना राजकीय आरक्षण जाहीर करून समान संधीचं वचन पूर्ण केले. आता ''लेक लाडकी'' योजनेमुळे राज्यातील गरीब कुटुंबात जन्माला येणाऱ्या कोणत्याही मुलीच्या शैक्षणिक प्रगतीत आर्थिक अडचणीचा अडथळा येणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com