मतदानासाठी पदवीधरांची नोंदणी गरजेची

मतदानासाठी पदवीधरांची नोंदणी गरजेची

२० (पान २ साठी, सेकंड मेन)

-rat१३p११.jpg-
२३M३७६४५
मंडणगड : मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित बैठकीत राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना तहसीलदार तानाजी शेजाळ.
-------
मतदानासाठी पदवीधरांची नोंदणी गरजेची

तहसीलदार शेजाळ ; मतदार यादी पुनर्रिक्षण बैठक
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १३ ः कोकण पदवीधर मतदारसंघातील मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रम १ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत सुरू आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त पदवीधरांनी नोंदणी करावी, या उद्देशाने मंडणगड येथे तालुक्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना पदवीधर मतदान नोंदणीची गरज व नोंदणीची प्रक्रिया याविषयी माहिती देण्यात आली.
तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी प्रतिनिधीशी संवाद साधताना तालुक्यातील सर्व पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सध्या सुरू असलेल्या कार्यक्रमात नावनोंदणी करण्याचे आवाहन केले. नावनोंदणीसाठी आवश्यक नमूद कागदपत्रांसह नमुना नं. १८ हा विहीत नमुन्यातील अर्ज भरुन तहसील कार्यालयाकडे सादर करणे गरजेचे आहे. मतदारसंघाची यादी नव्याने केली जात असल्याने सर्व मतदारांनी नोंदणी नव्याने करावी. त्याचबरोबर आवेदन पत्रासाठी आवश्यक कागदपत्रे व आवेदन पत्रात नमूद करण्याची माहिती त्यांनी दिली. या संदर्भात माहितीसाठी निवडणूक शाखेशी संपर्क साधावा. या वेळी प्रभारी नायब तहसीलदार सीमा पुजारी, समीर सावंत, शिवाजी बच्चेवार, वसंज गर्जे, कुणाल नाकती, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश शिगवण, शिवसेना शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख संतोष गोवळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस विश्वदास लोखंडे, रिपाइं जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे, माजी पं. स. सदस्य नितीन म्हामुणकर, माजी सरपंच किशोर दळवी, मनसेचे तेजस घस्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष सापटे, रिपाइं आंबेडकर गटाचे विजय खैरे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com