काजरघाटीतील महालक्ष्मी मंदिर सजले

काजरघाटीतील महालक्ष्मी मंदिर सजले

rat13p19.jpg-
37725
रत्नागिरीः काजरघाटी येथे नवरात्रोत्सवासाठी सजविण्यात आलेले महालक्ष्मी मंदिर.
----------
काजरघाटीतील महालक्ष्मी मंदिर सजले
रत्नागिरीः शहराजवळील काजरघाटी येथील महालक्ष्मी मंदिर नवरात्रोत्सवासाठी सजले आहे. आकर्षक विद्युत रोषणाई मंदिरावर केली असून रविवारपासून मंदिरात नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. मंदिरात नऊ दिवस विविध धार्मिक आणि करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत. निसर्गाच्या कुशीतील या मंदिराचा जीर्णौद्धार करण्यात आला. नवरात्रोत्सवात येथे भाविकांची मोठी गर्दी असते. यावर्षीही मंदिरात रविवारपासून उत्सव साजरा केला जाणार आहे. रविवारी घटस्थापना होणार असून २४ ला दसऱ्याला सोने वाटपाचा कार्यक्रम होईल. त्यासाठी महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टने जय्यत तयारी केली असून दहा दिवस मंदिरात विविध धार्मिक आणि करमणुकीचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
--------
rat13p20.jpg
37726
पावसः डॉजबॉल स्पर्धेत जिल्हास्तरावर विजेता ठरलेला स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरचा संघ.
-----------
स्वरुपानंद विद्यामंदिरचा संघ विजेता
पावसः जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत १९ वर्षे वयोगटात स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरचा मुलींचा संघ विजेता ठरला. डेरवण येथे ही स्पर्धा झाली. या विजयी संघात सानिया म्हादये, संयुक्ता वारीसे, रिना शेडगे, वैशाली नमसले, सानिया घवाळी, लावण्या तरळ, संचिता शेडगे, निशा कोसले, श्रेया कांबळे, सिद्धी मांडवकर यांनी उल्लेखनीय कामगिरी करून संघाला विजयी करण्यात मोलाचे योगदान दिले. मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री. कडवेकर, श्री. अलकुटे, सौ. लेंडवे, समिधा नार्वेकर यांचे ग्रामसुधारक सेवा समितीचे कार्यवाह सुरेश गुरव, शालेय समिती अध्यक्ष संतोष सामंत, लोकल कमिटी अध्यक्ष माधव पालकर, मुख्याध्यापक बाबासाहेब माने आदींनी अभिनंदन केले आणि विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
--------------
देवरुखला आज समानुभूती रॅली
साडवलीः देवरूख येथे शनिवारी (ता. १४) सकाळी साडे दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अंधदिनानिमित्त अंध मुले पथनाट्य सादर करणार आहेत. या मुलांसमवेत नागरीकही डोळ्यावर काळी पट्टी बांधून समानुभूती रॅली काढणार आहेत. स्नेहज्योती अंध विद्यालय महाड, स्पर्शज्ञान संस्था देवरूख व स्वयंपूर्तता फाउंडेशन रत्नागिरी यांच्यावतीने अंधदिन व वाचन प्रेरणा दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. दुपारी १२ वाजता लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन दीपिका रांबाडे, युयुत्सु आर्ते, रेवा कदम यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com