मडुरा येथे नवरात्रोत्सवानिमित्त
उद्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम

मडुरा येथे नवरात्रोत्सवानिमित्त उद्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम

37774
मडुरा माऊली

मडुरा येथील नवरात्रोत्सवात
उद्यापासून धार्मिक कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १३ ः मडुरा येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समिती अध्यक्ष संजू परब यांनी दिली. रविवारी (ता.१५) पासून कार्यक्रमांना प्रारंभ होईल.
रविवारी (ता.१५) सकाळी घटस्थापना होईल. सायंकाळपासून परबवाडी, रेडकरवाडी, देऊळवाडी व डीगवाडी मंडळांची भजने होतील. १६ ला रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्‌घाटन होईल. त्यानंतर विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब पुरस्कृत गोवा व सिंधुदुर्गातील नामांकित ग्रुपचा दांडिया (भूमिका आराध्या दांडिया ग्रुप कोरगाव, श्री देव रवळनाथ दांडिया ग्रुप तळर्णा व श्री थळकर दांडिया ग्रुप तळवडे), पावशी कुडाळ येथील सखी फुगडी संघाचा सदाबहार फुगडीचा कार्यक्रम. १७ ला सायंकाळी सातला स्थानिकांचे भजन व नऊला जय हनुमान पारंपरिक दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग. १८ ला सायंकाळी भजन व रात्री नऊला चेंदवणकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग. १९ ला सायंकाळी पाचला देऊळवाडीतील महिलांची फुगडी, ७ वाजता भजन व रात्री ९ वाजता पार्सेकर दशावतार मंडळाचे नाटक. २० ला सायंकाळी भजन, ८ वाजता महिलांसाठी पैठणी कार्यक्रम व ९ वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक. २० ला सायंकाळी ७ वाजता श्री देव समाधी पुरुष प्रासादिक भजन मंडळ मळगाव, ८.३० वाजता श्री देव सावंतवस भजन मंडळ इन्सुली व १० वाजता डीगवाडी ग्रामस्थ भजन मंडळाचा कार्यक्रम. २१ ला रात्री आठला सौ. संजना परब पुरस्कृत महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम. विजेत्यास १० हजार रुपये किमतीची पैठणी व उपविजेतीस ५ हजारांची पैठणी देण्यात येईल. साडेदहाला लकी ड्रॉ सोडत व स्पर्धांचा पारितोषिक वितरण कार्यक्रम. दुसऱ्या दिवसापासून रोज दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष परब व सचिव संतोष परब यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com