महावितरणचे खांबावर खासगी केबलचे अतिक्रमण

महावितरणचे खांबावर खासगी केबलचे अतिक्रमण

४ (पान ३ साठी)

महावितरणच्या खांबावर
खासगी केबलचे अतिक्रमण

चिपळूण, ता. १३ ः शहरात बीएसएनएलकडून इंटरनेटची सेवा ग्राहकांना पुरवली जाते. त्याशिवाय काही खासगी कंपन्याही शहरात इंटरनेट सेवा देत आहे. यातील काही खासगी कंपन्यांनी इंटरनेटची केबल टाकण्यासाठी महावितरणच्या विद्युत खांबांचा आधार घेतला आहे. या केबल खांबावरून काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. तरीही गेले चार महिने खांबावर खासगी केबल जैथे थे आहेत.
गेल्या काही वर्षात बीएसएनएलची सेवा कमकुवत होत चालली आहे. सार्वजनिक संस्था, बॅंका, पतसंस्था, सरकारी कार्यालये, खासगी कार्यालये आणि शाळा, महाविद्यालयामध्ये इंटरनेट सेवा आवश्यक झाली आहे. सुरवातीला बीएसएनएलकडून खांब उभारण्यात आले होते. मात्र शहरात इंटरनेट सुविधा देणाऱ्या काही खासगी कंपन्यांनी महावितरणच्या विद्युत खाबांचा आधार घेतला. विजेच्या खांबावर खासगी कंपन्यांना केबल टाकण्याचा अधिकार नाही. केवळ शासनाच्या महानेट कंपनीला खांबावरून केबल नेण्यास मान्यता दिली आहे. मात्र पायाभूत खर्च टाळून विद्युत खाबांचा आधार घेतला जात आहे. पावसाळ्यात दुरुस्तीच्यावेळी महावितरण कर्मचाऱ्यांना याचा त्रास होतो. याची माहिती महावितरणला मिळाल्यानंतर कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांनी तत्काळ संबंधित केबल चालकांना सूचना देत केबल काढून टाकण्याचे आदेश दिले होते. काही दिवसांची मुदतही देण्यात आली. मात्र चार महिन्यांनंतरही केबल जैसे थे आहेत. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता खासगी केबल दोन दिवसात काढल्या जातील, असे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com