मैदानी स्पर्धेत शिरगांव हायस्कूलचे यश

मैदानी स्पर्धेत शिरगांव हायस्कूलचे यश

मैदानी स्पर्धेत शिरगांव हायस्कूलचे यश
देवगड ः तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत तालुक्यातील शिरगांव हायस्कूलमधील १४ व १९ वर्षाखालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या मैदानी स्पर्धेत एकूण १९ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी ८ विद्यार्थ्यांनी विविध ११ प्रकारात यश संपादन केले आहे. त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी खेळाडू असे, १४ वर्षाखालील मुलगे थाळी फेक द्वितीय-कुणाल उघडा, २०० मीटर धावणे प्रथम-पार्थ अनभवणे, १४ वर्षाखालील मुली थाळी फेक प्रथम-अक्षरा ओटवकर, ४०० मीटर धावणे प्रथम-समीक्षा ठुकरुल, १९ वर्षाखालील मुली उंचउडी प्रथम-सुहासिनी दहिबावकर, लांबउडी प्रथम-सुहासिनी दहिबावकर, ८०० मीटर धावणे द्वितीय-सुहासिनी दहिबावकर, १९ वर्षाखालील मुलगे हातोडा फेक प्रथम-आदेश साटम, ४०० मीटर धावणे प्रथम-पवन अनभवने, गोळा फेक द्वितीय-संजीव बोडेकर, थाळी फेक द्वितीय-संजीव बोडेकर.
-----------
आडेलीत उद्यापासून धार्मिक कार्यक्रम
सावंतवाडी ः आडेली येथील श्री देव सोमेश्वर सातेरी पंचायतन मंदिरात प्रतिवार्षिक नवरात्रोत्सव १५ ते २४ या कालावधीत होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रोज सकाळी विधिवत पूजा, आरती व सायंकाळी ७ ते ९.३० पर्यंत ग्रामस्थांची सुश्राव्य भजने, रात्री ९.३० ते ११.३० पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम गरबा व दांडिया नृत्य, फुगडी इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव सोमेश्वर देवस्थान कमिटी, गावचे मानकरी, ग्रामस्थांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com