पाथरदेव येथे मोटारीने रिक्षाला धडक

पाथरदेव येथे मोटारीने रिक्षाला धडक

पाथरदेव येथे मोटारीने रिक्षाला धडक
रत्नागिरीः काळबादेवी-पाथरदेव येथे मोटारीने रिक्षाला धडक दिली. यामध्ये रिक्षाचालक जखमी झाला. ग्रामीण पोलिसात संशयित मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नंदकुमार शांताराम राणे (वय ५५, रा. सनगरेवाडी-कोतवडे, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १०) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली. संशयित मोटार (एमएच-०८-सी-४८९८) घेऊन रत्नागिरी ते गणपतीपुळे असे होते. काळबादेवी-पाथरदेव येथे त्यांच्यापुढे जाणाऱ्या रिक्षाला (एमएच-०८-एक्यू-९०२२) त्यांनी पाठीमागून धडक दिली. यामध्ये रिक्षा चालक प्रसाद प्रकाश पाटील (रा. बसणी, नागझरी, रत्नागिरी) हे जखमी झाले.
-------------
बावनदी येथे १० लिटर दारू जप्त
रत्नागिरीः बावनदी येथील सुक्या नदीपात्रात विनापरवाना गावठी हातभट्टी दारुची विक्री करणाऱ्याविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५६० रुपयांची १० लिटर दारु जप्त केली आहे. महेंद्र हरिश्चंद्र सांडीम (वय ५२, रा. तळेकांटे ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १२) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास बावनदी येथील सुक्या नदीपात्रात पोलिसांच्या निदर्शनास आली.
-------------
अपघातात जखमी प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरीः अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रौढाला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. सुभाष हरिश्चंद्र कुळ्ये (वय ५२, कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुभाष कुळ्ये यांचा अपघात झाला होता. त्यामध्ये ते जखमी झाले होते. अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
--------------
टरपेंटाईन पिल्याने वृद्ध अत्यवस्थ
रत्नागिरीः पाण्याची बॉटल समजून टरपेंटाईन प्राशन केलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अशोक संभाजी फुटक (वय ५२, रा. कुरतडे, रत्नागिरी) असे टरपेंटाईन प्राशन केलेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १३) सकाळी साडेअकराच्या सुमारास मजगाव रोड, मेस्त्री व्हिला येथे घडली. फुटक हे मेस्त्री व्हिला मजगाव येथे काम करत होते. तहान लागली म्हणून त्यांनी शेजारी असलेली पाण्याची बॉटल म्हणून टरपेंटाईन प्राशन केले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद झाली आहे.
------------
विष प्यायल्याने मुलगी अस्वस्थ
रत्नागिरी ः तालुक्यातील नेवरे-उंबरवाडी येथील मुलीने विष प्राशन केले. तिला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. वृषाली सुरेश शिंदे (वय १९, रा. नेवरे उंबरवाडी, रत्नागिरी) असे विष प्राशन केलेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १३) सकाळी आठच्या सुमारास नेवरे येथे घडली. नातेवाईकांनी तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com