आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन उत्साहात

आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन उत्साहात

३५ (पान ३साठी)

आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन उत्साहात

रत्नागिरी, ता. १३ ः ''आपत्ती येण्यापूर्वी निसर्ग संकेत देतो. त्याच्याकडे पाहिले पाहिजे. त्याबाबत अंमलबजावणीही करायला हवी. सजगतेने, एकदिलाने, एकमेकांचे हात धरुन येणाऱ्या आपत्तीला सामोरे गेल्यास जीवितहानी टाळू शकतो, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले.
आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अधिकारी, कर्मचारी यांनी शपथ घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी ही शपथ दिली. तसेच आपत्ती म्हणजे काय, याबाबत माहिती दिली. सूर्यवंशी म्हणाले, आपत्तीविषयी नेहमीच सजग राहायला हवे. विविध आपत्तींची माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी वाचन वाढविले पाहिजे. यातून आलेले अनुभव समृद्ध होतील. सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीबाबत खात्री करावी.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड म्हणाले, संयुक्त राष्ट्र संघाने आजचा दिवस जाहीर केला आहे. डब्लूएचओने मानवी प्रजातीला असणाऱ्या १० धोक्यांची यादी बनविली आहे. यात प्रथम क्रमांकावर पर्यावरण बदलाचा मुद्दा आहे. आपत्ती व्यवस्थापनात मन लावून काम करणे हे अपेक्षित आहे. जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांनीही अनुभव कथन करुन मॉकड्रिल घेण्याबाबत सूचना केली. या वेळी सर्वसाधारण शाखेच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, विशेष भूसंपादन अधिकारी निशा कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com