वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या इमारताचा बाऊ कशासाठी

वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या इमारताचा बाऊ कशासाठी

३१ (पान ३ साठीमेन)

वैद्यकीय महाविद्यालय इमारतीचा बाऊ नको

राजेश सावंत ; जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना चांगल्या सेवेसाठी प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : महिला रुग्णालयाची इमारत रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वापरली असेल तर त्यात काही वावगे नाही. इमारत दाखविल्याशिवाय महाविद्यालयाला परवानगी मिळाली नसती. महाविद्यालयाचा मोठा फायदा रत्नागिरीकरांना भविष्यात होणार आहे. कोरोना काळात या इमारतीचा वापर झाला होता. त्यानंतर ती रिकामीच होती, त्याचा बाऊ करण्याची गरज नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना चांगली सेवा मिळावी. तसेच नवीन वॉर्डमध्ये अतिरिक्त रुग्ण दाखल करण्याबाबत आम्ही जिल्हा शल्यचिकित्सकांशी बोलू, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी स्पष्ट केले.
ठाकरे शिवसेनेने काही दिवसांपूर्वीच महिला रुग्णालयाच्या इमारतीचा उद्देश बाजूला ठेऊन ती इमारत रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचा आरोप केला होता. त्याला शिंदे गटाने कालच उत्तर दिले. याबाबत आज भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रश्न कित्येक वर्षे सुटलेला नाही. वैद्यकीय महाविद्यालयामुळे भविष्यात डॉक्टर मिळतील. जोवर इमारत शासनाला दाखविली जात नाही, तोवर कॉलेजला परवानगी मिळत नाही. त्यामुळे वापरात नसलेली महिला रुग्णालयाची इमारत वैद्यकीय महाविद्यालयासाठी दाखविण्यात वावगे काहीच नाही.
जिल्हा रुग्णालयाच्या सेवेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. रुग्णांना खाटा उपलब्ध होत नाही. याबाबत आपण काय करणार. यावर श्री. सावंत म्हणाले, जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण येत आहेत. ओपीडीची संख्या ७०० ते ८०० वर गेली आहे. डेंगी, मलेरिया, तापसरी आदी साथींच्या रोगांमुळे रुग्णसंख्या वाढली आहे. अचानक रुग्ण वाढल्याने ही परिस्थिती आहे. डॉक्टर चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण जर नवा वॉर्ड तयार असेल तर व्हरांड्यात खाटा टाकून रुग्णांवर उपचार करण्यापेक्षा हे वॉर्ड सुरू करून त्यामध्ये रुग्णांना सेवा देण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फुले यांची भेट घेऊन तशी मागणी करू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com