इन्सुलीत पाच लाखांची दारु जप्त

इन्सुलीत पाच लाखांची दारु जप्त

37824
इन्सुली ः येथे जप्त केलेल्या मुद्देमालसह उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी व कर्मचारी. (छायाचित्र - नीलेश मोरजकर)

इन्सुलीत पाच लाखांची दारु जप्त

चालक पसार ः प्लायवूडमध्ये लपवून होणारी वाहतूक पकडली

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १३ ः गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या बेकायदा गोवा बनावटीच्या दारु वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने काल (ता.१२) रात्री उशिरा पावणे बाराच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत ५ लाख १० हजारांची दारु, ७ लाखांचा टेम्पो व २ हजार रुपये किमतीचे प्लायवूड लाकूड, असा एकूण १२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिकअप टेम्पोचा चालक मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. टेम्पोमधील कागदपत्रांवरुन बाबा वालाभाई हनुभाई (रा. गुजरात) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा दारु वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती इन्सुली पथकाला मिळाली होती. त्यामुळे वाहनांची तपासणी करण्याचे काम सुरू होते. काल रात्री पावणे बाराच्या सुमारास येणारा महिंद्रा पिकअप टेम्पो तपासणीसाठी थांबविण्याचा इशारा करण्यात आला. मात्र, चालक तसाच वेगाने टेम्पो घेऊन इन्सुलीच्या दिशेने पसार झाला. अधिकाऱ्यांनी पाठलाग केला असता महामार्गवर इन्सुली खामदेव नाक्यावर तो टेम्पो दिसून आला. मात्र, चालक फरार झाला. टेम्पोची तपासणी केली असता लाकडी प्लायवूडच्या खाली गोवा बनावटीचा बेकायदा दारुसाठा आढळला. सुमारे ५ लाख १० हजारांची दारु, ७ लाखांचा टेम्पो व २ हजारांचे प्लायवूड लाकूड असा एकूण १२ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय मोहिते, दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदीप रास्कर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, रणजित शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com