राज्य बॅडमिंटन स्पर्धा : आजपासून निवड चाचणी स्पर्धेला सुरवात, सुमारे ३०० हून अधिक बॅडमिंटनपटू दाखल

राज्य बॅडमिंटन स्पर्धा : आजपासून निवड चाचणी स्पर्धेला सुरवात, सुमारे ३०० हून अधिक बॅडमिंटनपटू दाखल

Published on

रत्नागिरी : जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेला शुक्रवारपासून (ता. ३) सुरुवात झाली. येथील सर्वंकष विद्यामंदिरच्या बॅडमिंटन कोर्टवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्य बॅडमिंटन असोसिएशनने यंदा पुन्हा राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा घेण्याची जबाबदारी रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनला दिली आहे. ही स्पर्धा ७ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. राज्यभरातील सुमारे ३०० हून अधिक बॅडमिंटनपटू दाखल झाले आहेत.

या कार्यक्रमाला गद्रे सी फूड्सच्या संचालिका मीनाताई गद्रे, सावंत ओवॅसिसचे केतन सावंत, सर्वांकष विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मोनिका जैस्वाल आणि राधा करमरकर, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष ओंकार हजारे, अमित मुळये, विनीत पाटील, सुधीर बाष्टे आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी गद्रे सी फूड्स, इंडियन ऑइल, सावंत ओवॅसिस स्पोर्टस् अरेना, देसाई फूड प्रोडक्ट्स, करूण्या मारिन आणि योनेक्स सनराईस यांचे सहकार्य लाभले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com