-सुधारित बातमी

-सुधारित बातमी

Published on

rat०५१५f.txt

बातमी क्र. १५ (टूडे पान ३ साठी, अँकर)

ओळी
- rat५p७.jpg ः
२३M४९३१८

शेनाळे ः गुरूवर्य पुण्यतिथीनिमित्त आयोजित मुलाखतीत व्यक्त होताना कविवर्य दिनकरबुवा दळवी व उपस्थित शाहीर, कलाकार मंडळी.
----------

गण, गौळण, पद कलाविष्काराने ब्रिदाला मानवंदना

संभुराजू घराणे ब्रीदपूजन ; गुरुवर्य दिनकर दळवींचा बहुमान

सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ५ ः संभुराजू घराण्यातील ब्रह्मनिष्ठ गुरूवर्य काशिराम कुंभार यांचे पट्टशिष्य गुरूवर्य गोविंद लाड व नामदेव दळवी (शेनाळकर) यांचे पुण्यस्मरण आणि संभुराजू घराणे ब्रीदपूजन, सागरीत मांड सोहळा शेनाळे येथे (ता. ३) झाला. गण, गौळण, पद, नाचाचा सुंदर कलाविष्काराने कार्यक्रमात रंग भरला. याप्रसंगी घराण्याच्यावतीने गुरूवर्य दिनकर बुवांना यापुढे कविवर्य दिनकरबुवा दळवी म्हणून संबोधन करण्याचा बहुमान एकमुखी घोषित करण्यात केला.
सकाळी गुरूवर्य यांचे पुतळापूजन घराण्याचे चिठ्ठी मालक अजित लाड व कांचन लाड यांच्या हस्ते विधिवत पूजन झाले. त्यानंतर संभुराजू घराणे ब्रीदपूजन रमाकांत लाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशंभू उन्नती कलामंडळाचे अध्यक्ष सुनील साळवी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. घराण्यातील सर्व गुरूवर्य, वस्ताद व शिष्यमंडळींच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. त्यानंतर माहू तांबिटकरवाडी, पाट, चिंचाळी येथील कलाकारांनी तुरेवाले ब्रिदाचे शिष्यत्व स्वीकारले. यानंतर शाहीर नरेश कदम आणि मंडळी (चिंचाळी) यांनी ब्रिदाला मानवंदना म्हणून गण, गौळण, पद असा नाचाचा सुंदर श्रवणीय कलाविष्कार सादर करून रंग भरले. यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेली गुरूवर्य दिनकरबुवा दळवी यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.
गुरूवर्य रामचंद्र म्हात्रे यांनी आपल्या श्रवणीय अशा अमोघ वाणीतून लोककलेतील काव्य याचे अंतरंग उलगडताना उदाहरणासह मार्गदर्शन केले. काव्याचा भावार्थ आणि मतितार्थ उलगडताना आपल्या अनुभवसंपन्नतेने त्यावर कलात्मक प्रकाशझोत टाकताना भूत, वर्तमाकाळात घडलेल्या घटनांचा दाखला देत पुढे भविष्यकाळात या प्रवाहात नेमकं काय साध्य करावे आणि यासाठी आपली वाणी, गाणी आणि सादरीकरण कसे असायला हवे यावर सखोल मंजुळ वाणीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी ओम शिवशंभू उन्नती कला मंडळ, शेनाळे ग्रामस्थ, मुंबई, पुणे मंडळाचे पदाधिकारी, सदस्यांनी मेहनत घेतली. चिठ्ठी मालक गुरूवर्य शिवराम पोटले, अजित लाड, शिवशंभू मंडळाचे अध्यक्ष सुनील साळवी, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष मधुकर साळवी, सरपंच विश्वनाथ सावंत, शशिकांत लाड, संभुराजू तुरेवाले सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष विद्यानंद अधिकारी यांनी आभार मानले.
-----
दिनकरबुवांच्या शब्दातून मनाला उभारी देणार

आपल्या अनुभवसंपन्नतेने कलाविश्वाचे अंतरंग उलगडताना लोककलेतील प्रवास शब्दरूपाने समोर उभा करताना कविवर्य दिनकर दळवी यांनी मोजक्या आणि गर्भित शब्दांतून घराण्यातील व या शक्तीतुरा लोककलेतील शाहीर, कलाकारांना दिलेला अनमोल संदेश आणि त्यांच्या कलात्मक आठवणी हृदयात कायमच्या कोरल्या गेल्या. दिनकरबुवांचा प्रत्येक शब्द मनाला उभारी आणि कलात्मक आनंद देऊन गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com